रामायण आणि महाभारत व्यक्ति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रामायण आणि महाभारत व्यक्ति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ जून, २०२१

रामायण आणि महाभारत या दोन्हींमध्ये असलेली पात्रे



 भारतीय महाकाव्ये रामायण आणि महाभारत या दोन मुख्य काव्य ग्रंथांना म्हटले जाते. ही ग्रंथ फक्त भारतीयांची धर्मग्रंथ नसुन ती त्यांच्या जीवनाचाच एक भाग झालेली आहेत उदाहरणार्थ. दोन मराठी व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ते ' राम राम 'बोलतात, दोन गुजराती व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ते ' जय श्रीकृष्णा 'बोलतात. वृन्दावन, मथुरा या प्रदेशात व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ते ' राधे - राधे ' बोलतात," इत्यादी. त्याच बरोबर काही म्हणी व वाक्यप्रचारसुद्धा यातूनच आले आहेत. उदाहरणार्थ ' हा सूर्य आणि हा जयद्रथ ', वाईट वागणाऱ्या आईला कैकयी आहेस का ?, एखाद्या गोष्टीत काही अर्थ नाही आहे हे सांगण्यासाठी ' त्यात काय राम नाही ', एखादा व्यक्ती वारला तर त्यांचे केव्हाच ' राम नाम सत्य झाले.' लंकेची पार्वती असणे, इत्यादी. अशा प्रकारे रामायण आणि महाभारत एक प्रकारे आदर्शच आहेत. 

रामायण हे द्वापारयुगात आणि महाभारत हे त्रेतायुगामध्ये झाले पण रामायणातील काही व्यक्तिरेखा हे महाभारतात सुध्दा दिसून येतात.  

या दोन्हीं युगांमध्ये मध्ये असलेली पात्रे आपण पाहू या.  

 

भगवान परशुराम 

रामायण - रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर भगवान परशुराम यांचा सीता स्वयंवरात लक्ष्मण आणि प्रभु रामचंद्र यांच्याबरोबर संवाद झाला होता.

महाभारत - पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, अंगराज कर्ण यांना धनुर्विद्येचे शिक्षण दिले. 

ब्रम्हर्षी वशिष्ठ 

रामायण - वशिष्ठ मुनी हे रघु वंशाचे कुलगुरु म्हणून होते.  

महाभारत - पितामह भीष्म यांच्या पूर्वजन्मी 'ध्यु ' नावाचे वसू होते, त्यांनी वशिष्ठ मुनी यांच्या आश्रमातील कामधेनू गायीचे अपहरण केले होते. 

महाबली हनुमान 

रामायण - प्रभु राम यांच्या वनवासात हनुमानाची भेट झाली होती. त्यानंतर राम अयोध्येला जाईपर्यंत त्यांच्या सोबतच होते. 

महाभारत - धनुर्धर अर्जुन, महाबली बलराम, दिव्य सुदर्शन चक्र, पांडू पुत्र भीमसेन, पौंड्रक इत्यादी सर्वांचे गर्वहरण केल्याचा महाभारतात उल्लेख आहे.  

रामभक्त जांबवंत 

रामायण - महाबली वाली यांचा कनिष्ठ बंधू सुग्रीव यांचा मुख्य सल्लागार म्हणून रामायणात होते त्याच बरोबर त्यांनी ऋषी शापाने हनुमानास विस्मृतीत गेलेली आपल्या शक्तीचा परिचय करून दिला होता.

महाभारत - भगवान श्रीकृष्ण यांची चौथी पत्नी जांबवती ही रामभक्त जांबवंत यांची कन्या होती. सामंत्यक मणी च्या शोधात श्रीकृष्ण जांबवंत यांच्या गुहेत शिरून त्यांच्याबरोबर युध्द करून त्यांना हरवले. 

भगवान महादेव

रामायण -  लंकाधिश रावण याने आपल्या वीस हातांनी भगवान महादेव यांचा कैलास पर्वत उचलला होता, हे साहस व शिवस्तुति पाहून प्रसन्न होऊन महादेवांनी ' चंद्रहास ' नावाची खङग बहाल केली होती. प्रभु रामचंद्र यांनी रावणाबरोबर युध्द करण्याच्या अगोदर भगवान महादेव यांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते.

महाभारत - पितामह भीष्म आणि भगवान परशुराम यांचे युध्द होते तेव्हा भगवान महादेवांना मध्यस्थी करून हे युध्द थांबवावे लागले. आणि काशीराज कन्येला पुढच्या जन्मी तू भीष्मांच्या मृत्यूला कारण होशील असे वरदान दिले.  

मयासूर राक्षस 

रामायण - लंकाधिश रावण यांचे सासरे, सती, रावण पत्नी मंदोदरी यांचे पिता मयासुर यांनी लंकादहनानंतर रावणाला खूप मदत केली होती. 

महाभारत - खांडवप्रस्थाच्या वनामध्ये दडून बसलेले वास्तुशिल्पकार मयासूराला अर्जुनाच्या हल्ल्यापासून कृष्णाने वाचवले आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे भविष्यात याच मयासुराने इंद्रप्रथ राज्यात पांडवांसाठी एक मयसभा नावाची एक अद्भूत वास्तू निर्माण केली.  

महर्षी भरद्वाज 

रामायण - महर्षी वाल्मिकी यांचे शिष्य म्हणून रामायणात त्यांचा उल्लेख आढळतो. 

महाभारत - गुरु द्रोणाचार्य, पांचालचा राजा द्रुपद, आणि अग्निवेश मुनी हे महर्षी भारद्वाज यांचे शिष्य होते. आचार्य द्रोण हे भारद्वाज मुनीचे पुत्र होते.   

रामायण आणि महाभारत या दोन्ही मध्ये पुढील व्यक्तीरेखांचा समावेश होता.

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...