रंगभूमीचे प्रदर्शन आणि सुतपुत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंगभूमीचे प्रदर्शन आणि सुतपुत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

रंगभूमीचे आयोजन आणि शौर्या

 

रंगभूमीचे आयोजन 

द्रोणाचार्यानी सर्व शिष्यांची परीक्षा, पारख, आणि त्यांच्या अंगीचे गुण सर्व हस्तिनापूर नगरातील प्रजेस, आणि राजपरिवारातील सर्व सदस्यांना व्हावा यासाठी हस्तिनापूर सम्राट यांना भेटतात धृतराष्ट्र द्रोणाचार्यांना म्हणतात " या आचार्य, आमच्या कुरु कुळातील कुमारांचे विद्या ग्रहणाचा कार्यकाळ आज समाप्त होत आहे. तेव्हा कोणी कोणत्या शस्त्रामध्ये पारंगत झाले आहे." द्रोणाचार्य म्हणाले " महाराज, मी माझ्या मुखातुन त्यांचे गौरव उद्गार काढण्यापेक्षा आपण सर्वांनी त्यांचे अंगाचे कौशल्य प्रत्यक्ष आपल्या नयनांनी पाहावे." धृतराष्ट्र म्हणतात ठीक आहे मग हा योग केव्हा येणार आहे." द्रोणाचार्य म्हणाले " महाराज मी विदुरांबरोबर बोललो आहे हस्तिनापूरच्या बाहेर उत्तर दिशेला एक विस्तीर्ण भूमी आहे तिथे राजपरिवार, मंत्रिमंडळ, आणि सर्व हस्तिनापुरातील प्रजेसाठी ते शस्त्र, अस्त्र चे कौशल्य पाहता यावे यासाठी वेगळे प्रेक्षकालय निर्माण करावयाचे ठरविले आहे फक्त आपली सहमती हवी होती." धृतराष्ट्र म्हणतात " महामंत्री विदुर त्या रंगभूमीचे निर्माण लवकरात लवकर व्हावे. " महामंत्री विदुर " हो, आवश्य सम्राट म्हणून निघून गेले. द्रोणाचार्य धृतराष्ट्र यांना म्हणतात " हे हस्तिनापूर सम्राट, मी आपल्या कुरु कुळातील सर्व कुमारांना योग्य शिक्षण दिले आहे आणि त्यांनीही आपआपल्या तन, मन, बुध्दीच्या प्रमाणे ग्रहण केले आहे. त्यांचे जर शस्त्र, अस्त्र कौशल्य जर आपण आणि आपल्या नगरातील सर्वांनी पाहावे. नगराच्या बाहेर उत्तरेला एका विस्तीर्ण भूमिवर रंगभूमीचे ( रंगभूमी म्हणजे गुरु द्रोणाचार्य शिष्यानी मागील एका तपामध्ये, १२ वर्षांमध्ये जे गुण आत्मसात केले त्याचे प्रदर्शन करणे ) आयोजन केले गेले.




गुरु द्रोणाचार्यांनी ज्या दिवशी रंगभूमीच्या ठिकाणी सर्व शिष्यांच्या अंगीचे प्रदर्शन पाहण्याचा दिवस ठरला. त्या दिवशी हस्तिनापूर नगरांतील सर्व अबालवृध्द त्या रंगभूमीच्या दिशेने चालू लागले. सर्व वर्णातील लोक तिथे उपस्थित होते, पाहता पाहता ते प्रेक्षकालय भरून गेले. या रंगभूमीमध्ये हस्तिनापूर सम्राटाचे सिंहासन उंच ठिकाणावर होते त्याच्या दोन्ही बाजूस महामंत्री, भीष्म यांचे सिंहासन व इतर मंत्री यांचे सिंहासन, त्या नंतर वेगवेगळ्या देशांचे राजे, महाराजे यांची सिंहासने होती. एका उंच जागी राजपरिवारातील स्त्रीया यांच्यासाठी वेगळे प्रेक्षालय निर्माण केले गेले होते हे सर्व विभाग उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या वस्त्रांनी आच्छादिले होते. त्या मैदानाच्या बरोबर मध्ये विविध शस्त्रांचे भांडार होते.

अचानक तुतारीच्या गांभीर आवाज झाला. त्याबरोबर रंगभूमीच्या द्वारातुन आचार्य द्रोण आणि अश्वत्थामा दोघेही त्या विस्तीर्ण मैदानात प्रवेश केला. त्या पाठोपाठ आपल्या वयोमानाप्रमाणे युधिष्ठीर, दुर्योधन, भीमसेन, दुःशासन, अर्जुन इत्यादी सर्व कुमारांचे आगमन झाले. ते सर्व आपल्या वेगवेगळ्या रथांनी, शस्त्रांनी सुसज्य होऊन आले. सम्राट धृतराष्ट्र आणि पितामह भीम यांच्या सिंहासना समोर येऊन द्रोणाचार्य म्हणाले, " प्रणिपात सम्राट, कुरुकुलातील महान कुळातील कुमारांना शिक्षण देण्याचे पवित्र काम पितामहांनी मला सोपविले हे माझे परम भाग्य समजतो. आणि याच हस्तिनापूर नगरातील प्रजेसमोर माझे शिष्य त्यांच्या एका तपामध्ये काय - काय शिकले, कोणते गुण अवगत केले आहे यांचे प्रदर्शन घडवतील. ही स्पर्धा बिलकुल नाही, फक्त आपल्या अंगी असलेले गुणांचे प्रदर्शन आहे याचे विस्मरण होता कामा नये आणि प्रजेनीही त्या कुमारचे कौशल्य पाहून दाद दिली पाहिजे. महाराज, पितामह जर आपली आज्ञा असेल तर आपण हे शौर्याचे प्रदर्शन सुरु करू या." सम्राट धृतराष्ट्र पितामह भीष्म यांच्याकडे पाहत म्हणतात "आवश्य आचार्य, प्रजेबरोबर आम्हासही अधिक उत्कंठा लागली आहे होय ना तातश्री." पितामह भीष्म भावुक होऊन म्हणतात " आचार्य अधिक समय न दवडता आपण हे सामर्थ्याचे प्रदर्शन सुरु करावे." गुरु द्रोणाचार्य म्हणाले जशी आपली इच्छा " असे म्हणून आपल्या शिष्यांकडे जातात तिथे सर्वांना काहीतरी उपदेश करतात तेव्हा त्या छोट्या शिष्य सेने मध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते.




युधिष्ठीराचे शस्त्र प्रदर्शन 

रंगभूमीच्या एका उंच स्तंभात मध्ये पहारेकरीनी आरोळी दिली. " कुरु कुळातील जेष्ठ कुमार, द्रोणाचार्य शिष्य, पांडू कुमार युधिष्ठीर येत आहे हो." तेव्हा युधिष्ठीर मैदानात आला त्याने आपल्या हातातील भाला भूमीवर ठेवून प्रथम गुरु द्रोणाचार्यांना प्रणाम केला, त्यानंतर सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, माता गांधारी, काकाश्री विदुर, माता कुंती या सर्वांना प्रणाम करून आशीर्वाद मिळविला. सर्व जेष्टांकडून कृपा आशीर्वाद मिळाल्यानंतर युधिष्ठीर जमिनीवरील आपले शस्त्र उचलून, त्या भाल्याला दोन्ही हाताने गोल - गोल फिरवितात त्यानंतर एका हाताने गोल फिरवितात, कधी ढाल उंच हवेत भिरकावून आपला भाला त्या ढालेंच्या बरोबर मध्ये घुसवितात. कधी रथावरून, कधी अश्वावरुन, लगोलग अनेक लक्ष्यावर एकापाठोपाठ एक अनेक भाल्याने भेद केले. हे पांडुपुत्राचे कौशल्य पाहून सर्वत्र साधू... साधू ..., पांडू पुत्र विजयी भव: अश्या आरोळ्यानी आसमंत दणाणून सोडले.

अशा प्रकारे सर्व कुमारांनी आपल्या अंगीचे कौशल्य हस्तिनापूर प्रजेच्या समोर ठेवले. आणि त्यांनीही सर्वांना साधू... साधू ..., विजयी भव: अश्या जयघोषांनी त्यांचे अभिनंदन केले.

to be continued....

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...