अर्जुनाची धनुर्विद्या प्रदर्शन
रंगभूमीवर अर्जुनाने आपले धनुर्विद्येतील कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला. त्यांने सर्वांना वंदन केल्यावर प्रथम अर्जुनाने आग्नेय अस्त्राने त्या रंगभुमीवर सर्वत्र आग्नि प्रदीप्त केला. त्या अग्नीने सर्व नगरजण भयभीत झाली तो अग्नी अर्जुनालाही भस्म करून टाकेल असे वाटताच अर्जुनाने पाठीमागील भात्यात हात घालून एक बाण काढला वीरासन घालुन धनुष्यामध्ये लावुन मनात काही मंत्र पुटपुटून तो बाण आकाशात सोडला. आणि काय आश्चर्य आकाशात सर्वत्र काळेभोर ढग निर्माण झाले. कोणत्याही क्षणी वर्षा होईल असे वातावरण निर्माण झाले. मध्येच एक जोरदार वीज चमकून तो अग्नी शांत करण्यासाठी अर्जुनाने वरुण अस्त्राचा प्रयोग केला होता.
सर्वत्र अर्जुनाचा विजय असो ! जय हो अर्जुन ! असे जयजयकार चालु होते. त्या जलाने तो अग्नी शांत झाला तेव्हा अर्जुनाने पर्जन्यास्त्राचा उपयोग करून सर्व नगरजण यांना जल वर्षावाने चिंब भिजवून टाकले. तेव्हा लगेच भात्यातील बाण काढुन वायव्य अस्त्राचा प्रयोग करून आकाशात दाटून आलेले काळेभोर ढग एका क्षणात स्वच्छ करून टाकले. ज्या प्रकारे वनराज सिंह मेंढाच्या कळपात शिरून त्यांना उद्वस्त करतो त्याप्रमाणे त्या ढगांना हटविले.
त्या नंतर अर्जुनाने पर्वतास्त्राचा प्रयोग करून रंगभूमीचे रूपांतर एका पर्वतराजित करून टाकले. त्यांना हटवुन अर्जुन स्वतः अंतर्धनास्त्राचा प्रयोग करून अंतर्धान झाला. तो मैदानात कोठेही दिसेना झाला. सर्व प्रजा आश्चर्याने हे सर्व दृश्य पाहत होते. तो कधी रथांवर, कधी अश्वांवर, कधी गजावर, तर कधी भूमीवर डोळ्यांचे पाते लावते ना लावते तो एका ठिकाण्याहुन दुसऱ्या ठिकाणी जाई धनुर्विद्या, मल्लविद्या, ढाल - खडग चालवणे, भाला इत्यादी सर्व अस्त्र शस्त्रामध्ये अर्जुनाने प्राविण्य मिळविले होते. सर्व कौशल्य पणाला लावुन आपली ग्रहण केलेली विद्या अर्जुनाने प्रदर्शित केली. तेव्हा सर्वत्र एकाच आवाज घुमत होता. अर्जुन ! अर्जुन!! अर्जुन !!!.
अर्जुनाला आव्हान
गुरु द्रोणाचार्य आपल्या सिंहासनावरून उठून म्हणाले " हस्तिनापूर नगर वासियाने पहा माझ्या प्रिय शिष्याने मी शिकविलेले सर्व अस्त्र -शस्त्र यांचा खुबीने वापर करून दाखवले आहे. याची चपळता, बाहुबल, हस्तकौशल्य, धनुर्विद्या कुरु कुळातच नाहीतर संपूर्ण आर्यवर्तात याच्या सारखा दुसरा कोणताच धनुर्धर नाहीये. अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे." एवढे बोलताच जवळ असलेली निळ कमळाची माला घेऊन द्रोणाचार्य अर्जुनाकडे जाऊ लागतात. ती माला अर्जुनाच्या गळ्यात घालताच ' थांबा ' असा आवाज झाला. रंगभूमीच्या प्रवेश द्वाराकडून एक ढगात वीज कडाडावी त्या समान एक युवक हातात धनुष्य, पाठीवर भाता, बलदंड पण कसदार रेखीव शरीर, सिंहासमान डौलदार चाल, खणखणीत विजेसमान आवाज, कानात मांसल सोनेरी कुंडले, पिवळा धमक वर्णाचा तो युवक द्रोणाचार्या समोर येऊन उभा राहिला.
त्या रंगभूमीवरील सर्वांची नजरा त्या द्वारातील सुंदर युवकांवर खिळून राहिली. दुर्योधन - दुःशासन आदी सर्व बंधू आपआपली शस्त्रे घेऊन उठून उभा राहिली. इकडे अर्जुनाच्या सभोवताली इतर चार म्हणजे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव हे चौघेही आपआपली शस्त्रे घेऊन अर्जुनाच्या रक्षणासाठी जवळ येऊन उभा राहिली. तो युवक म्हणाला हे " पार्थ, धनुर्विद्येतील जे जे चमत्कार तू केलेस त्यापेक्षा अधिक सरसपणे मी करून तुला दाखवेन, जास्त हस्तकौशल्याचा अभिमान करू नकोस," तेव्हा दुर्योधनाला अधिक प्रसन्नता वाटली त्याने भीष्म पितामह, सम्राट यांना म्हणाला " हे हस्तिनापूर सम्राट आपल्या राज्यातील एक युध्द कुशल युवक आपली कला प्रदर्शित करू इच्छित आहे. तर सद्वर्तनी पितामह, न्याय प्रिय काकाश्री विदुर, सम्राट आपण या युवकासाठी एक संधी आणि आपला निर्णय त्याच्यासाठी न्याय ठरणार आहे त्याला हक्क मिळालाच हवं ." सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, महामंत्री विदुर, या सर्वांनी आपापल्या बरोबर काही तरी कुजबुज केली. त्यांनी निर्णय दिला की या युवकांनीही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून दाखवावे. तेव्हा अर्जुनाने जे जे धनुर्विद्येच्या साहाय्याने करून दाखवले ते सर्व त्या युवकाने करून दाखवले विशेषतः अर्जुनापेक्षा अधिक सरसपणे करून दाखवले. सर्व रंगभूमीवर या युवकाचा विजय असो !, जय हो ! असा जयजयकार होऊ लागला.
हे पाहून दुर्योधन आनंदाने त्या युवकांकडे जाऊन म्हणाला " हे युवक, मित्रा, तुझे स्वागत आहे, तू आलास हे आमचे भाग्य " तो युवक म्हणाला " हे कुमार, मला या पार्थासोबत द्वन्द्व करायचे आहे, आणि मीच या आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे हे सिध्द करायचे आहे. " दुर्योधन म्हणाला " हो अवश्य, मित्रा." तेव्हा तो युवक म्हणाला "आचार्य, आपण जर पार्थला आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत असाल तर माझ्याबरोबर द्वन्द्व करून तो निर्विवादपणे सिध्द करेल." तेव्हा कुलगुरू कृपाचार्य पुढे येतात आणि म्हणतात, " हे युवक, अर्जुन हा सोमवंशी, कुरुकुलातील, राजमाता कुंतीदेवीचे अनुज पुत्र, सम्राट, दिग्विजयी पांडूपुत्र क्षत्रिय आहे, त्या प्रमाणे तू पण आपला परिचय दे त्याने तुझे माता - पिता कोण आहे ? कोणत्या महान कुळातील आहेस ? त्याचा परिचय दे, एक राजा दुसऱ्या एका राजाबरोबर द्वन्द्व करू शकतो, एक राजकुमार एका राजकुमाराबरोबर किंवा एका राजाबरोबर द्वन्द्व करू शकतो, एक सेनापती एका सेनापती बरोबर किंवा एका राजकुमाराबरोबर द्वन्द्व करू शकतो, तू आपले परिचय द्यावे."
या कुलगुरू कृपाचार्य यांच्या वाक्याने तो युवक नि:शब्द झाला.
to be continued....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा