रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

पांडू - माद्री विवाह

 




मद्र देशावरील संकट

विदुर म्हणतात " सम्राट खूप बिकट परिस्थिती आली आहे आपल्यावर, आपले मित्र राष्ट्र मद्रदेशाकडून मद्रनरेश यांचा संदेश आला आहे की, मद्र देशावर शत्रूंनी आक्रमण केले आहे तरी मित्रत्वाची जाण ठेवुन आपण आम्हाला मदत करावी असा संदेश घेऊन हा दूत आला आहे. तेव्हा माझे मत असे आहे की, आपले आत्ताच विवाह झाला आहे, आपण नव दाम्पत्य झाले आहेत, विवाहानंतर आपणास विश्रांतीही मिळाली नाहीय तर आपण आदेश द्यावे की, दुसऱ्या कोणाला तरी मद्रनरेशच्या मदतीसाठी पाठविण्यासाठी," पांडू म्हणाला "महामंत्री, मी राजाची शपथ घेतली आहे की मी प्रजेचा प्रथम व माझा वयक्तिक सुखाचा नंतर विचार कारेन," शकुनी म्हणाला सम्राट, आपल्या मताशी मी सहमत आहे, आपण स्वतः गेलात तर दोन उद्दिष्ट्ये साध्य होतील एक तर शत्रूवर आपला वाचक बसुन, शत्रू आपआपल्या सीमेत मर्यादेत राहतील, आणि दुसरा म्हणजे आपल्या प्रजेच्या मनात राजाविषयी आदर, प्रबळ राजा, मदतीला धावून जाणारा राजा, मैत्री निभावनारा अशी ओळख निर्माण होईल." पांडू म्हणाला " अगदी बरोबर गांधार कुमार, तेव्हा मी स्वतः शत्रूवर चालून जाईन, कारण शत्रू मला कमकुवत समजत आहे, नवीन राजा, नवीन लग्न, म्हणून शत्रू पण मला पारखू पाहत आहे." भीष्म म्हणाले "सम्राट आपले नवीनच विवाह झाला आहे आपण जाणे ठीक होणार नाही, पण आपण विचार केलाच असेल तर मी आघाडीवर असणार सम्राट आपण फक्त आदेश द्या." पांडू म्हणाला " नाही तातश्री, आपण जर आलात तर आपल्या खांद्यावरच हे साम्राज्य उभे आहे असे प्रजेला वाटेल, आआम्ही असताना जेष्टांना युद्धाला पाठवणे हा अधर्म होईल, आणि एका मित्र राजाचे रक्षण करणे हे दुसऱ्या राजाचे कर्तव्य आहे." अशा प्रकारे पांडूने सर्वांना विनंती पूर्वक सांगितले, व मद्र देशावर झालेल्या शत्रूच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मलाच जाऊ द्यावे हे पटवुन सांगितले. आणि या दरबारात सर्वानुमते हा निर्णय झाला की, मद्र देशाचे रक्षण करण्यासाठी पांडूने जावे.

मद्र देशाचे रक्षण

पांडू त्वरित आपल्या सेनापतीला आदेश देतात " सेनापती आपल्या सेना त्वरित सज्ज करा मी आत्ताच निघणार आहे " सेनापती जशी आपली आज्ञा म्हणून निघून गेले. राजमाता सत्यवती म्हणाली "पांडू पण तू उद्या प्रातःकाळी पण जाऊ शकतोस." पांडू म्हणाला " होय राजमाता, मी उद्या प्रातःकाळी पण जाऊ शकतो, पण ही माझी कमजोरी होईल आणि शत्रूला मद्रवर आक्रमण करण्यास पूर्ण समय भेटेल, संधी प्राप्त होईल ही अनमोल संधी मला जाऊ द्यायची नाही." पांडू आपली भार्या कुंती हिची भेट घेऊन आपली विशाल सेनेसह मद्र देशाच्या मदतीला जातात.

पांडू - माद्री विवाह

काही काळानंतर पांडू हस्तिनापुरी येतात हस्तिनापूर राजमहालाच्या प्रवेशद्वारी सर्वजण आपल्या विजयी सम्राटाचे स्वागत करण्यासाठी आतुरले होते, कुंती स्वतः आपल्या पतीच्या स्वागताला औक्षण करण्यासाठी सज्ज असते, पांढऱ्या शुभ्र अश्वांचा रथ आणि त्यावर दिसणारे पांडू जणू आकाशात तळपता सूर्य रथावर आरूढ होऊन येत आहे असे भासत होते. रथ जवळ येऊन थांबतो, पांडू रथातून उतरतात, इकडे स्वागताला आलेलले सर्वांच्या मनात आश्चर्य, कुतूहलता, जाणून घ्यायची आशा असते. प्रजाजण आपल्या विजयी राजाचे जयजयकार करतात.

सत्यवती म्हणते, "अभिनंदन पांडू, तुझ्या पहिल्या विजयाचे हार्दिक अभिनंदन." पांडू म्हणतो "धन्यवाद राजमाता." मग कुंती आपल्या पतीचे औक्षण करते, पांडू म्हणतो," कुंती मी तुझ्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे " असे म्हणून पांडू रथाच्या दिशेने हात करतात, रथातून एक लावण्यवती कन्या उतरते, मंद हास्य करून पांडूच्या मागे मागे चालत राहते, पितामह भीष्म विचारतात " ही कन्या कोण आहे?" पांडू म्हणतो, "तातश्री मद्र देशाच्या मदतीसाठी जाऊन शत्रूला पराजित केल्यामुळे मद्रराज शल्य यांनी मला एक भेट स्वीकारावी लागेल असे वचन घेतल्यामुळे मला त्यांनी आपली भगिनी या माद्री बरोबर माझा विवाह करून दिला आहे त्यामुळे मी ते वचन मोडु शकलो नाही." भीष्म म्हणाले "एक राजा म्हणून तु योग्यच वागला आहे, पण एक पती म्हणून हा कुंतीवर अन्याय झाला आहे पांडू." तेव्हा पांडू काही बोलण्याच्या आधी माद्री सरळ जाऊन कुंतीच्या चरणाजवळ बसुन म्हणते "माफी करावे दीदी, माझ्या शल्य बंधूला या विषयी खरंच माहिती नव्हते " पण मी वचन देते की, मी आपला शब्द कधीच मोडणार नाही, सदैव आपल्या आज्ञेत राहीन." कुंती माद्रीच्या हाताला धरून उठवते आणि म्हणते, " तु मला दीदी पण म्हणतेस आणि माफी पण मागतोस या मध्ये तुझा काहीही दोष नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, आता तु या हस्तिनापूर साम्राज्याची राणी आहेस, असे दासी सारखे कृत्य करणे राणीला शोभत नाही." माद्री म्हणते " नाही दीदी, मी तुमची आणि आर्यची दासी म्हणूनच सदैव सेवा करेन " अशा प्रकारे माद्रीने सर्व जेष्ठ मंडळी, आणि कुंतीचे मन जिंकल्यावर मोठ्या आनंदाने राजमहालात प्रवेश करतात. पण कुंतीच्या मनात आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या माणसावर कोणी दुसरा पण हक्क सांगतो हेच शल्य कुठेतरी बोचत होते.

इकडे पुढे काही दिवसातच पांडूने संपूर्ण आर्यावर्तातील सर्व राष्ट्रांवर आक्रमण करून, संपूर्ण दिग्विजय केला आणि युद्धात अमाप संपत्ती गोळा करून आपल्या हस्तिनापूर साम्राज्याची कीर्ती अधिकच गाजविली. पण या मद्र वरील आक्रमन रोखने, आर्यावर्तात दिग्विजय या युद्धामुळे पांडुस थकवा जाणवू लागला होता. (आदिपर्व अध्याय ११३ - ११४)

पांडूचा आपल्या दोन्हीं पत्नी समवेत वनविहार

दुसऱ्या दिवशी राजमाता सत्यवती पांडूच्या महालात येतात आणि म्हणतात " पांडू गेली कित्येक महिने आम्ही तुझी वाट पाहत होतो, तू कुंतीच्या विवाह नंतर लगेच मद्रराज यांच्या मदतीला गेलास, आता या युद्धामुळे, धावपळीमुळे खुप थकवा तुझ्या मुखावर स्पष्ट्पणे दिसत आहे. तेव्हा तू आणि तुझ्या दोन्ही पत्नीं सोबत वनामध्ये विहारास जावे तेवढाच तुझा थकवा जाईल." पांडू म्हणाला " पण राजमाता... " पांडू काही बोलायच्या आत सत्यवती म्हणाली " हे पहा पांडू कुंतीच्या विवाहानंतर पहिल्या रात्रीच तू युद्धासाठी निघून गेलास, आता माद्रीच्या वेळेस पण तू राजकारभाराच्या गोंधळात न पडता लगेच वनात मनःशांती, शरीराचा थकवा घालवावा अशी माझी आज्ञा आहे." पांडू म्हणाला जशी आपली आज्ञा म्हणून पांडू वनामध्ये जाण्यास तयार झाला. पांडूने पितामह भीष्म महामंत्री विदुर,जेष्ठ धुतराष्ट्र, कुलगुरू कृपाचार्य यांच्याशी विचारविमर्श करून दोन्ही पत्नी समवेत वनात विहार करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी महाराज पांडू, आपली पत्नी कुंती आणि माद्री समवेत वनामध्ये मन व शरीराचा थकवा घालविण्यासाठी निघतात. पांडू हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शालवृक्षाच्या जंगलामध्ये राहू लागले.

विदुर विवाह

इकडे भीष्मांनी देवक राजाच्या इथे विदुराच्या विवाहासाठी एका कन्येसाठी मागितले, आणि देवकांनी त्याला सहमती पण दिली, तेव्हा भीष्मांनी विदुर आणि पारसवीदेवी यांचा विवाह करून दिला. विदुर दासी पुत्र असल्याने पारसवीदेवी ही कन्या पण एका शूद्र स्त्रीच्या गर्भपासुन, ब्राम्हण द्वारे निर्माण झालेली सुशिल कन्या होती.

                                                                                                                           to be continued....

पांडू आणि कुंती यांचे हस्तिनापूरमध्ये आगमन

 


कुंतीचे स्वयंवर पांडूने जिंकल्यावर, महाराज कुंतिभोज यांनी पांडू व कुंती यांचा विधिवत विवाह केला, आणि काही दिवस राहून, सम्राट पांडू हस्तिनापुरी जातात, तिथे महाराज पांडूला हे समजले की, कुंती ही महाराज कुंतिभोज यांची कन्या नसून तर ती यदुवंशीच्या वृष्णी कुळातील शूरसेन व मरीषादेवी या दांपत्याची एक कन्या आहे, शूरसेन यांना वसुदेव हा एक पुत्र आणि पृथा, राजाधिदेवी, श्रुतकिर्ती, श्रुतदेवी, श्रुतश्रवा या पाच कन्या, महाराज कुंतिभोज हे शूरसेन यांचे आतेबंधू, कुंतिभोज यांना कोणतेही आपत्ये नसल्याने त्यांनी पृथाला दत्तक घेतले होते. तेव्हा तिचे नाव पृथा वरून कुंतिभोज यांची कन्या म्हणून कुंती असे पडले.

काही दिवसांनी पांडू कुंतिभोज राजाकडे येऊन हस्तिनापूर राज्याकडे प्रस्तानसाठी आज्ञा द्यावी अशी विनंती करतात. कुंतिभोज राजा मोठ्या अंतःकरणाने कुंतीला निरोप देतात. महाराज पांडू हस्तिनापूरकडे निघाले तेव्हा कुंतिभोज राजाने अमाप संपत्ती, दागदागिने, दास - दासी, इ. आपल्या सोबत घेऊन कुरुराष्ट्राकडे निघाले, पांडूनी आपल्या राजपरिवारातील सर्वांचे वर्णन करून सांगिलते.

कुंतीचे हस्तिनापुरात आगमन

इकडे हस्तिनापूरमध्ये पांडूनी स्वयंवर जिंकल्याची वार्ता साऱ्या हस्तिनापूरमध्ये पसरली होते. तेव्हा ही वार्ता अगोदरच सर्वांना पोहचली असल्याने, हस्तिनापूरच्या मुख्य महाद्वाराजवळ जेव्हा पांडू आणि कुंती आले तिथे यांच्या स्वागताला स्वतः महामंत्री विदुर आले होते, त्यांनी सहर्ष पांडूचे स्वागत केले, " महाराज पांडू, आणि राणी यांचा विजय असो !" तेव्हा पांडू म्हणाले " हे राजशिष्टचार राहू दे विदुर, पहिले सांग तुझ्या वाहिनीचे स्वागत नाही करणार का ?",विदुर म्हणाला," हो भ्राता, आमच्या वाहिनीचे स्वागत आम्ही स्वताः त्यांच्या रथाचे सारथ्य करून स्वागत करणार." मग विदुर पांडूच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या अधिरथ यांना म्हणाले, "अधिरथ आपण प्रवास करून थकला असाल तेव्हा आपण आराम करावे." अधिरथ म्हणाले "जशी आपली आज्ञा महामंत्री." अधिरथ रथातून उतरून, महाराज पांडू यांची परवानगी घेऊन निघून जातात. विदुर स्वता: पांडू आणि कुंती यांच्या रथाचे सारथ्याच्या आसनावर बसुन, "आज्ञा द्यावे राज्ञी." पांडू हसत म्हणाला "आज्ञा द्यावे राणी " कुंतीही हसून म्हणाली " चला विदुर भावजी."

तेव्हा विदुर आपल्या भ्राता आणि वाहिनी सोबत मुख्य राजमहालाकडे जातात, तिथे स्वागताला राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, माता अंबिका आणि अंबालिका, कुलगुरू कृपाचार्य, गांधारी हे सर्व पांडूने स्वयंवरात जिकंलेल्या कुंतीच्या स्वागताला सज्ज होते. गांधारीने पांडू व कुंतीचे औक्षण करून कुंतीला म्हणते, "मी गांधारी, हस्तिनापूर सम्राज्ञी कुंतीचे स्वागत करते," कुंती म्हणाली, "नाही दीदी, आपण माझ्यापेक्षा मोठ्या आहात, आपण मला फक्त कुंतीच म्हणा आणि आपण माझे स्वागत केलात त्याबद्दल धन्यवाद. तेव्हा पांडू व कुंतीने सर्व थोरांचे आशीर्वाद घेऊन, राजमाता सत्यवतीला म्हणतात, "जेष्ठ नाही आले, अजुन मनातून राग गेलेला दिसत नाही." सत्यवती म्हणाली "मी समजावुन सांगेन धृतराष्ट्राला," पांडू म्हणाला "नाही राजमाता मीच त्यांची भेट घेणार, प्रथम आपल्या इष्ट देवतेचे दर्शन घेऊन येतो. पांडू आणि कुंती दोघेही इष्ट देवतेला प्रणाम करण्यासाठी मंदिराकडे जातात. अशा प्रकारे कुंतीचा राजमहालामध्ये प्रवेश होतो. त्या दिवशी संपूर्ण हस्तिनापूरमध्ये सर्वत्र आनंदी आनंद साजरा केला जातो. त्या निमित्याने पांडूने भरपूर प्रमाणात दानधर्म करतात.

मद्र देशावर शत्रूचे आक्रमण

कुंती पांडूच्या राजमहालामध्ये बसलेली असताना, आपल्या पहिल्या पुत्राची, आठवण येते, तो कोठे असेल ?, तो कसा असेल ?, तो वाचला असेल का ? आपण त्या विषयी पांडूला आर्यांना सांगावे का ?, ते काय म्हणतील असे अनेक प्रश्न कुंतीच्या मनात येऊ लागतात. तेव्हा पहारेकरी आरोळी देतात, " सावधान, सम्राट पांडू येत आहेत हो." कुंती आपल्या विचार चक्रातून जागृत होते. सम्राट पांडू आपल्या राजमहालात प्रवेश करतात, पांडू कुंतीला म्हणतात, "कुंती तुला हे आमचे हस्तिनापूर कसे वाटले, तुला आवडले का ?" कुंती म्हणाली, "आर्य आमच्या कुंतिभोज पेक्षा खुपच मोठे आहे आणि महान सुद्धा." पांडू म्हणाले, "कुंती तूला स्वयंवरा पासून मला काही बोलायचे होते पण समयच नव्हता " कुंती खाली पाहत म्हणाली," बोला आर्य कशा बद्दल बोलायचे होते." तू स्वयंवरात असा का प्रश्न विचारला होतास ? काय जाणून घ्यायचे होते तुला ?" कुंती म्हणाली "महाराज मला हृदयाची खोली जाणून घ्यायची होती." पांडू म्हणाला "पण स्वयंवरात तुला मनाचे समाधान करून घ्यायचे होते ना." कुंती म्हणाली "मला हृद्याबरोबरच, बुध्दीची पण परीक्षा करायची होती." मग मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो का ?" कुंती म्हणाली " हो आर्य, आपण उत्तीर्ण पण झालात आणि आपल्या मोठ्या मनाची पण कल्पना आली." आणि अचानक पहारेकर्यांनी सर्वांना सावध करण्याचे नागरे वाजवले. पांडू सावध होऊन " नगारे एवढ्या समयानंतर वाजतायेत म्हणजे हे काहीतरी मोठे संकट असले पाहिजे." कुंती घाबरून म्हणाली " संकट ! आता, ते कसले आर्य." पांडू म्हणाला "माहिती नाही कुंती पण संकट आहे, मला त्वरित राज दरबारात जावे लागेल. आणि असे बोलून पांडू राजदरबाराकडे निघून जातात पण इकडे कुंतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते." तिथे अगोदरच राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, जेष्ठ धृतराष्ट्र, महामंत्री विदुर आले होते, पांडू राजदरबारात येतात, आणि जाऊन सिहासनावर विराजमान होतात आणि विदुरकडे पाहून म्हणतात "महामंत्री कोणते संकट आले आहे हस्तिनापुरवर." विदुर म्हणतात " सम्राट खूप बिकट परिस्थिती आली आहे आपल्यावर, आपले मित्र राष्ट्र मद्रदेशाकडून मद्रनरेश यांचा संदेश आला आहे की, मद्र देशावर शत्रूंनी आक्रमण केले आहे तरी मित्रत्वाची जाण ठेवुन आपण आम्हाला मदत करावी असा संदेश घेऊन हा दूत आला आहे."

 to be continued...

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...