रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

महाभारत

 


महाभारत हे एक जगातील सर्वांत मोठे महाकाव्य आहे. आणि या काव्यात राग, रंग, सौन्दर्य, क्रोध, अहंकार. मोह, व्देष, मत्सर, इ. अनेक रंगा — ढंगाचा मिलाप या काव्यात मिळतो. महाभारत म्हणजे एक अथांग महासागर आहे, अंत नाही असा तो खोल व लांब आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या नदीला लहान — लहान ओढे, नाले, नद्या येऊन मिळतात, त्या प्रमाणे या महाभारतात अनेक लहान — मोठ्या कथा येऊन मिळतात, त्या महाभारत काव्याला मोठा आकार देऊन एक महान काव्य निर्माण करतात.

जसे प्रत्येक चित्रपटाला एक नायक आणि एक खलनायक असतो असाच या कथेमध्ये श्रीकृष्ण हा सर्व कथेचा अभिनेता आहे. तोच सर्व सामर्थ्य सूत्रधार सुद्धा आहे, तर पाच पांडव व द्रौपदी ही या कथेचे सहकलाकार आहेत.

श्रीकृष्ण व शकुनी या दोघांनी मांडलेला हा बुद्धिबळाचा डाव आहे. त्या मध्ये श्रीकृष्णाकडे पांडव व पांचाळ वीर हेच मुख्य सैन्य आहेत तर शकुनी कडे शंभर कौरव, भिष्म, कर्ण, द्रोण, कृपादि दिग्गज मुख्य सैनिक आहेत, श्रीकृष्ण व शकुनी हे कपाटनीतीतील पारंगत एकमेकांसमोर लढण्यास निघालेत. परंतु शकुनीकडे द्रोणाचार्य व कृपाचार्य या दोन आचार्य व्यतिरिक्त आणखीन एक आचार्य आहे, विदुरनीतीच्या एकदम विरुद्ध अशी नीती, की तो कपटनीतीतील एक महान व क्रुर राजनीतीज्ञ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे नाव आहे ‘कणिकाचार्य.’ याच आचार्याने धृतराष्ट्र आणि शकुनी यांना पांडवांचा समुळ नाश करण्याचा सल्ला दिला होता, लाक्षागृह प्रकरनामध्ये शकुनीची साथ,दुर्योधनाचा हट्ट, व धृतराष्ट्र यांचा पुत्रमोह, कर्णाची युद्धपिपासु वृत्ती या धृतराष्ट्राची बाजु बळकट वाटत होती.

परंतु त्रिकालदर्शी भगवान श्रीकृष्णा पुढे त्या कोणाचेच चालणार नव्हते, याची त्यांना जाणीव नव्हती, कृष्णांम वन्दे जगद्गुरुंम l

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...