लाक्षागृहात प्रवेश
वारणावत नगरात पोहचल्यावर सर्व पांडव आणि त्यांची माता कुंती यांची राहण्याची व्यवस्था नागरापासून दूर एका नवीन, प्रशस्थ, विस्तीर्ण अश्या जागेवर पुरोचन याने महाल बनविला होता, त्यांच्या देखभाल, सुरक्षा यांची जबाबदारीही पुरोचन यांच्यावरच होती. पांडवांचे रक्षण त्यांची राहण्याची, जेवण्याची आणि दिखभालीची जबाबदारी पुरोचन यांच्यावर होती.
वारणावत नगरात पोहचल्यावर सर्व पांडव आणि त्यांची माता कुंती, यांनी आपले रथ त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती, तेथे येतात तो राजमहाल पाहून सर्वजण थक्क होतात. भीम म्हणाला " पुरोचन, एवढा सुंदर महाल हस्तिनापूर मध्ये सुध्दा नाही, कसे काय एवढा खर्च केले आहे इथे. " पुरोचन मोठेपणाने खुदकन हसून म्हणाला " कुमार, हस्तिनापूर युवराज येणार म्हणून मागील कित्येक वर्षांपासून हे महाल तयार करणे चालू आहे, आणि याचे नाव लाक्षागृह असे आहे. " सहदेव म्हणाला पुरोचन महाशय मला हा प्रश्न पडला आहे की हा एवढा भव्य महाल नगरापासून दूर का केला असेल, नगराजवळ पण हा महाल होऊ शकला असता.?" पुरोचन कपाळावरील घाम पुसून म्हणाले " तसे काही नाही कुमार ही हवेशीर जागा आहे म्हणून ही जागा निवडली एवढीच." पण सहदेवाला या उत्तराने समाधान झाले नाही. कुंती म्हणाली,"मला कधी एकदा महादेवाचे दर्शन घेऊ असे झाले आहे." पुरोचन म्हणाले राजमाता आपण आत्ताच आलात आजचा दिवस आराम घेऊन उद्या प्रातःकाळी भगवान महादेव यांचे दर्शन करण्यासाठी जावे, मी आपल्या सर्वांची दर्शनाला जाण्याची तयारी करतो. असे म्हणून पुरोचन निघून गेला.
विदुरचा गुप्त संदेश
पुरोचनाने आपल्या सेवेने सर्वांचे मन जिंकले होते. त्या बरोबरच सर्व पांडवांसाठी एक स्त्री - पुरुष सेवेसाठी दिला होता. कुंतीसाठी सुध्दा एक दासी आणि दास त्यांच्या हाताखाली सर्व कामे करण्यास दिला होता. हा आदर सत्कार पाहून कुंती माता ही खूप खुश होत्या. दुसऱ्या दिवशी सर्वांनी वारणावत नगरातील प्रसिध्द महादेव मंदिरामध्ये जाऊन भगवान महादेव यांचे दर्शन घेतले. आणि सर्व जण परत राजमहालाकडे आले. पण युधिष्ठिराच्या मनामध्ये एक प्रश्न सतत येत होता की काकाश्री विदुर यांनी मला म्लेंछ भाषेमध्ये असे का सांगितले असेल की वनांत जर वणवा पेटला असेल तर सर्व प्राणी, पशु - पक्षी, वृक्ष - वेली नष्ट होतात पण मूषक, उंदीर हा एकाच प्राणी त्यातून मार्ग कडून आपले प्राण वाचवू शकतो, कारण तो आपले मार्ग जमिनीवरून न शोधात जमिनी खालून मार्ग तयार करतो. मूषक कोण, मूषकाचे जमिनी खालून मार्ग म्हणजे या विचारताच युवराज गढून जातात.
महात्मा विदुर आपल्या गुप्तहेर यांना सांगतात की लाक्षागृहा पासून दूर अंतरावर कोणाच्या दृष्टीस न येण्यासारखे लाक्षागृहाच्या आतपर्यंत लवकरात लवकर एक भुयारी मार्ग तयार करा, आणि दुसरे टोक अरण्यात काढा. त्याने पांडवांचे प्राण वाचले पाहिजे.
अन्नदानाचा संकल्प
अशा प्रकारे जवळपास पांडव वर्षभर लाक्षागृहात राहिले. राजमाता कुंतिनी नगरातील अन्न दान करण्याचा संकल्प केला. तेव्हा लाक्षागृहाकडे नगरजणांची रांगच लागली. हळू हळू दिवस जाऊ लागले. पांडव शिकारीच्या निमित्याने बाहेर पडत घनदाट जंगलातील रानवाटा माहित करून घेऊ लागले. हस्तिनापूरहुन एक संदेश पुरोचन यांस आला की, दोन दिवसांनी रात्री हे लाक्षागृह महाल पेटवून द्या. नेमका हा खलिता पुरोचन वाचताना अर्जुन चोरून ऐकले, तो पळत येऊन आपल्या सर्व बंधू आणि कुंती मातेला येऊन सांगतो. अर्जुन सांगतो " माता, जेष्ठ, पहा हा पुरोचन दोन दिवसांनी आपल्यासहित संपूर्ण लाक्षागृहाला भस्म करू पाहतोय, मी तर म्हणतो आजच आपण हे लाक्षागृह पेटवून देऊ आणि निसटून जाऊ." युधिष्ठीर म्हणाला " नाही अर्जुन त्यांना आपला संशय येईल, आपण उद्याच रात्री जाऊ, त्यांना हे जाणवू देता कामा नये की आपल्याला हे माहिती झाले आहे. मला आत्ता कळाले की काकाश्री विदुर या भुयाराविषयी बोलत होते ते खरंच किती काळजी करतात आपल्या सर्वांची, आता तुम्ही सर्व जण आपआपल्या कक्षांमध्ये विश्राम करण्यासाठी जा, काही दगा झाल्यास लगेच माझ्या कक्षांत या माझ्या कक्षांपासूनच ते भुयारी मार्ग दूर वनांत निघतो असे विदुर काकांच्या गुप्तचाऱ्याने मला सांगितले आहे. तो पर्यंत भुयारी मार्ग पूर्ण झाला होता.
भिल्लिणी आणि पाच पुत्र
दुसऱ्या दिवशी किती तरी नर - नारी लाक्षागृहांत भोजन करून निघुन गेली. रात्र झाली, अन्न संपत आले. पांडवांनीही आपआपले भोजन करून आपआपल्या कक्षांत विश्रांतीसाठी निघून गेले. तेव्हा मध्यरात्री एक वृध्द भिल्लिणी आपल्या पाच पुत्रांसहित लाक्षागृहात आली. त्यांनी आम्ही कित्येक दिवस भुकेले आहोत आम्हांस कळाले आहे की हस्तिनापूर युवराज अन्नदान करत आहेत तेव्हा कुंतीने त्यांनाही येथेच्छ भोजन देऊन तृप्त केले, ते निघणार तेव्हा कुंतीने त्यांना मध्यरात्री कोठेही न जात येथेच विश्राम करावा असा आग्रह केला. पण ही वार्ता पुरोचन यास माहिती नव्हती, कारण ते मध्यरात्री आले होते. तो मनातल्या मनात म्हणाला करून घ्या किती अन्नदान करायचे आहे ते उद्या ते करता येणार नाही तुम्हाला, उद्याची शेवटची रात्र असणार आहे. आपण पांडवांना उद्या लाक्षागृहांसहित अन्नीच्या स्वाधीन करणार आहोत या विचारानेच आनंदी होऊन मनसोक्त मद्य प्राशन करून सैनिक आणि सेवकांसहित झोपी गेला. इकडे चार पांडव माता कुंतीसह युधिष्ठीर यांच्या कक्षात आले त्यांनी त्याच कक्षातील आपआपल्या हातात जळते मशाले घेतले प्रथम भीमाने सर्व जण निद्रित आवस्थेत आहेत हे पाहून सर्व लाक्षागृहाच्या द्वाराला अग्नी लावला, म्हणजे कोणी बाहेर पडता कामा नये, आणि इतर चार बंधूनी लाक्षागृहाच्या वेगवेगळ्या दिशेने अग्नी दिला शेवटी सर्व युधिष्ठिराच्या कक्षात येऊन जेथून भुयार खोदला आहे, तेथुन हळू हळू भुयारात जाऊ लागली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा