रविवार, १८ डिसेंबर, २०२२

दुर्योधन - भीम गदायुध्द

 


द्रोणाचार्य शिष्याची रंगभूमीमध्ये आपआपल्या अंगीचे प्रदर्शन चालू होते. युधिष्ठीर नंतर आता वेळ होती ती कुरु कुमार दुर्योधन याची प्रथम त्याने आपले आचार्य गुरु द्रोणाचार्य, पिता धृतराष्ट्र, माता गांधारी, आणि मामा शकुनी यांना वंदन करून शास्त्रागाराकडे वळला. त्याने आपल्या भरभक्कम शरीरास शोभेल असे गदा हे शस्त्र निवडले. पण यासाठी दोघे जण आवश्यक होते आणि गदा युध्दात दुर्योधनाच्या तोडीचा भीमसेन पेक्षा दुसरा योध्दा कोणी नव्हता हे आचार्यांनी जाणले तेव्हा आचार्य द्रोणाचार्यांनी पांडूपुत्र भीमसेन यास दुर्योधन बरोबर गदा युध्दाचे प्रदर्शन करावयास सांगितले, पण आपली मर्यादा व गदायुध्दाचे नियम पाळून शक्ति प्रदर्शन करा असे आदेश दिले दोघांसही दिले.




दुर्योधन - भीम गदायुध्द 

 

दुर्योधन अतिशय आनंदात होता. दुर्योधनाला वाटू लागले आज ती वेळ आहे या गदेंनी भीमाचे मस्तकच विदीर्ण करून टाकणार आणि हस्तिनापूर प्रजेला दाखवून देईन की मीच गदायुद्धात सर्वश्रेष्ठ आहे. इकडे भीम पण अतिशय आनंदात होता, त्याला पण हेच पाहिजे होते. त्याने प्रथम आपले गुरु द्रोणाचार्य, माता कुंती, माता गांधारी, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, काकाश्री विदुर व जेष्ठ युधिष्ठीर यांना प्रणाम करून मैदानात उतरला तो ही आनंदाने आपल्या हातातील गदा हवेत वर उंच भिरकावुन त्या मैदानात उडी घेतली. आणि गदा हवेतच असताना हातात पेलली त्या जमिनीवर असा काय आघात झाला की धरणीकंप झाला की काय असे सर्वांना स्पष्ट जाणवले. दोघेही सावध होत, एकमेकांकडे पाहत, गोल फिरत आपल्या हातातील गदेने जोरदार प्रहार करू लागले. ते दोघे जेव्हा हातात गदेने एकमेकांवर प्रहार करीत तेव्हा अग्नीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत. गदा घेऊन ते लढताना दोन मदमस्त हत्ती हत्तीणीच्या हव्यासासाठीं जंगलात लढतात त्याप्रमाणे वाटू लागले. दोघांचे शरीर बलदंड, उंच, भरदार छाती, भरभक्कम बाहू, चपळ हालचाल, दोघेही प्रचंड शक्तिशाली, गदेच्या प्रहाराने रंगभूमीवर फक्त ठण... ठाण... ठाण... आणि द्वेषाने ओरडण्याचा आवाज येत होता दोघेही मंडलाकार घेत प्राणपणाने वार करत होते, वार चुकवत होते. कधी खाली बसून, कधी उंच हवेत उड्डाण करत. दोघेही समान वाटत होते. कधी भीमसेन वरचढ वाटे, तर केव्हा दुर्योधन, दोघेही घामाने चिंब भिजले होते. या सर्वांत आचार्य आणि विदुर यांनी तयार केलेली भूमि मात्र पूर्ण उखडून निघाली होती. प्रजेत मात्र दोन गट झाले होते, एक गट पांडुपुत्रांचा विजय असो !! वाहव्वा रे भीमसेना ! असे ओरडू लागले, दुसरा गट धृतराष्ट्र पुत्रांचा विजय असो !! खूपच छान रे दुर्योधन ! असे मोठमोठ्याने जयजयकार करू लागले. सर्वांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या, खूप समय झाला पण त्या दोघांमधला कोणीही मागे, किंवा कमी वाटत नव्हता.




 

गुरु द्रोणाचार्यांचा हस्तक्षेप

 

दुर्योधन आणि भीम यांचे गदायुध्द मात्र थांबत नव्हते. तेव्हा ही गोष्ट गुरु द्रोणाचार्यांना समजली तेव्हा त्यांनी अश्वत्थामाला बोलवुन त्याच्या कानात म्हणाले " पुत्र अश्वत्थामा, हे गदायुध्द थांबव, ते दोघे त्वेषाने एकमेकांवर वार करत आहेत, जा थांबव " अश्वत्थामा पळतच त्या मैदानात जाऊन ते गदायुध्द कसे तरीच थांबविले. पण त्यांच्या मनात आणखीन युध्द करायचेच होते. ते अश्वत्थामाने समजावल्यानंतर मात्र नाइलाजानें ते आपआपल्या सिंहासनावर जाऊन बसले.

या नंतर नकुल - सहदेव यांनी आपले खङग आणि ढाल घेऊन शत्रू बरोबर कसे लढावे, हे दाखवून दिले. वार करताना खङगचा आणि वार झेलताना ढालीचा उपयोग कशाप्रकारे प्रकारे करावा. भूमीवर, रथावर, गजावर, अश्वांवर तलवारबाजी करून नकुल - सह्देवनी सर्व प्रजाजनाचे वाहवा मिळविली. प्रजेतून पांडुपुत्रांचा विजय असो ! पांडुपुत्रांचा विजय असो !! अश्या जयघोषणानी रंगभुमी गर्जून निघाली. या नंतर सर्व महारथी धृतराष्ट्र पुत्रांनी एका तपामध्ये आत्मसात केलेले विद्या सर्वांनी हस्तिनापूर प्रजेसमोर ठेवली, त्यातील कोणी रथाचे उत्तम सारथ्य करून दाखवले, कोणी अश्वांवर उभारून सवारी करून दाखविले, कोणी गजावर आरूढ होऊन त्यास शत्रूवर कशी चाल करून जावे ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवित होते.




अर्जुनाचे शक्ती प्रदर्शन

हे सर्व झाल्यानंतर गुरु द्रोणाचार्य उभे राहिले आणि त्यांनी बोलावयास सुरवात केली, " महान हस्तिनापूर नगरजन हो, आता माझ्या पुत्रापेक्षा प्रिय असा शिष्य, उत्तम धनुर्धारी, सर्व विद्या पारंगत, देवराज इंद्रपुत्र, पांडूपुत्र अर्जुन येणार आहे. तेव्हा कुंतीपुत्र मैदानात आला. पिळदार देहाचा, भरदार  छाती, पोलादी दंड, या बरोबरच त्याने उत्तम असे राजवस्त्रे परिधान केले होते. अंगावर पोलादी कवच, मस्तकी सुवर्ण मुकुट परिधान केले होते. हातामध्ये धनुष्य आणि पाठीवर विविध बाणांनी भरलेला भाता होता. चेहऱ्यावर विलक्षण तेज पसरले होते. अर्जुन मैदानात येताच गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्माचार्य, महाराज धृतराष्ट्र, कुलगुरू कृपाचार्य, माता कुंती आणि माता गांधारी, काकाश्री विदुर, जेष्ठ युधिष्ठीर, जेष्ठ भीमसेन या सर्वांचे आशीर्वाद घेऊन रंगभूमीमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला. प्रथम अर्जुनाने आपल्या पाठीवरील भात्यामध्ये हात घालत एक बाण काढला आणि काहीतरी पुटपुटत आकाशात सोडला. आणि काय आश्चर्ये सर्व रंगभूमीवरील गुरुवर्य, प्रजाजण, राजपरीवारातील वरिष्ठ या सर्वांवर पुष्पवृष्टी होऊ लागली त्याने त्याद्वारे आशीर्वाद मागितला. सर्वांनी त्याला हात उंचावुन आशीर्वाद दिला अर्जुनानेही हो नम्रपणे स्वीकारला. सर्वत्र जय हो अर्जुन !, अर्जुनाचा विजय असो ! असे जयजयकार सर्वत्र घुमू लागला.




 

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...