रविवार, २५ डिसेंबर, २०२२

कर्ण - अर्जुन यांचे द्वन्द्व

 


राजमाता कुंती मूर्च्छित




द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांच्या साहस, शक्ती, आणि सामर्थ्याचे प्रदर्शन आता वेगळेच रूप घेऊ लागले होते. तेवढयात एक सैनिक धनुर्धारी अर्जुनाच्या जवळ येऊन कानात काहीतरी सांगितले आणि तो राजपरिवारातील स्त्रीयांसाठी जे प्रेक्षकालय तयार केले होते त्या दिशेने जाऊ लागला. तिथे माता गांधारी, भगिनी दु:शला, गुरुमाता कृपी आणि इतर राजपरिवारातील स्त्रिया होत्या, अर्जुन जाताच तिथे दासीच्या घेऱ्यामध्ये राजमाता कुंती मूर्च्छित अवस्थेत पडलेल्या होत्या. मूर्च्छित होण्या अगोदर कुंतीने कर्णच्या शरीरावरील लक्षणांवरून म्हणजे पिवळा धमक शरीराचा रंग, कुरुळे केश, जन्मताच असणारे अभेद्य कवच आणि कानातील मांसल कुंडल या वरून ओळखले की हा तर माझाच पुत्र आहे. महर्षी दुर्वासा यांच्या सेवेने प्रसन्न होऊन मिळालेल्या प्रथम मंत्राचा प्रभाव, प्रथम देवता भगवान सूर्यनारायण यांचा कृपा आशीर्वाद, मंत्राचे खरेपणा जाणून घेण्याची उत्सुकता, या सर्वांचे कारण मी आणि माझे कर्म हे कुंतीला स्पष्ट दिसत होते. त्याचाच परिणाम आता आपल्याच दोन्ही बंधूंमध्ये कोणी तरी एक राहणार आणि एक जण मरण पावणार हे घडणार होते, ती देवांकडे सतत प्रार्थना करत होती, गप्प बसावे की मोठ्याने ओरडून सर्वाना सांगावे की हा कर्ण माझा पुत्र आहे,

राधापुत्र नव्हे कुंतीपुत्र, अधिरथ पुत्र नव्हे पांडू पुत्र, सूतपुत्र नव्हे सूर्यपुत्र, सारथी नव्हे क्षत्रिय, अंगराज नव्हे तर हस्तिनापूर नरेश होण्याचा ज्याचा हक्क तो नाही मिळू शकला. किती हालअपेष्ठा, लोकांची बोलणी किती सहन केले असेल या विचारानेच ती कोमेजून जायची पण सध्या या रंगभूमीवर कसे व कोणाला कसे सांगणार या मुळे ती शांत राहिली, पण आपलेच दोन्ही पुत्र एकमेकांसमोर धनुष्यबाण घेऊन एकमेकांचे प्राण घेणार याचा विचार करूनच ती मूर्च्छित झाली.

रंगभूमीवर सर्व कुमारांच्या शस्त्रांचे प्रदर्शना बरोबर, कर्णचे राज्यभिषेक, आणि आता कुरु कुमार अर्जुन बरोबर द्वन्द्व असे लगेच क्षणाक्षणाला चित्र पालटू लागत होते, द्वन्द्व हे अटळ झाले होते. अर्जुन आपल्या कुंती माता यांचा आशीर्वाद घेऊन परत आला होता. दुर्योधन कर्णाला म्हणाला " मित्र, आता तुला अर्जुन बरोबर द्वन्द्व करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही."




कर्ण - अर्जुन यांचे द्वन्द्व

" थांबा ! सुर्यास्था नंतर अशा समयी द्वन्द्व करणे, शास्त्रात निषिध्द मानले गेले आहे." - कुलगुरू कृपाचार्य.

कर्ण आणि अर्जुन यांचे द्वन्द्व सुरु होणार होते, दोघेही आपआपल्या पाठीवरील भात्यातील एक एक बाण काढून धनुष्यावर संधानासाठी सज्ज केले होते तेवढ्यात सूर्य नारायण अस्ताला पोहचले होते. तरी सुध्दा त्या रंगसभेतील हस्तिनापूर नागरिकांमध्ये आता परस्पर विरोधी, सरळ सरळ दोन गट निर्माण झालेले दिसत होते, एक गट ' अंगराज कर्णचा विजय होवो !' असे म्हणत होते तर एक गट ' पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो !' असे घोषणा देत होते सारी रंगभूमी अशा घोषणांनी दुमदुमून गेली होती. तेव्हा कुलगुरू कृपाचार्य म्हणाले " थांबा ! सुर्यास्था नंतर अशा समयी द्वन्द्व करणे, शास्त्रात निषिध्द मानले गेले आहे." तेव्हा कर्ण आणि अर्जुन दोघेही आपआपल्या स्थानावर स्तब्ध राहिले. गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या हातातील पांढरा शुभ्र शंख मोठ्याने फुंकला आणि शिष्यांच्या सामर्थ्याची परीक्षा, शक्तीचे प्रदर्शन समाप्त झाल्याचे जाहीर केले. काही क्षणात रंगभूमीवर अंधार पसरला, हस्तिनापूर नगरातील प्रजा धनुर्धर अर्जुनाचे गुणगान करत होती, तर काही अंगराज कर्णची वाहवा, तर तिसरा गट अंग देशाला योग्य राजा मिळवुन दिला, अंग देशाचे मगध पासुन रक्षण केले, अर्जुनाला शह देण्यासाठी कर्णला आपल्या बाजूने घेतले, आपण जातीयता मानत नाही हा संदेश प्रजेला दिला, आपण किती कृपाळू आहे हे कृतीतून दाखवून दिले, अशाप्रकारे दुर्योधनाचे वागणे कसे बरोबर होते हे सांगत होते.




रंगभूमी हळूहळू रिकामी होऊ लागली आता प्रजा आपआपल्या निवास स्थानी निघून गेल्यावर सर्व राजपरिवारातील, स्त्री - पुरुषही निघून गेले. पाच पांडव आपले गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सोबत निघाले. कौरव ही अंगराज कर्ण बरोबर अंधारातुन मशालाच्या प्रकाशाने वाट काढत हस्तिनापूर राजवाड्याकडे निघून गेले.  (आदिपर्व अध्याय १३६, श्लोक १६ - २५).

 

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...