रविवार, १८ डिसेंबर, २०२२

सुतपुत्र ते अंगराज कर्ण

 


तू कोण ?, तू आपला परिचय दे, कोणत्या महान कुळातील तू ?, तुझे माता - पिता कोण ? या प्रश्नाचे उत्तर त्या युवकाला सांगता आले नाही. आचार्य द्रोण कृपाचार्यांना बोलले " कुलगुरू नदीचे मूळ आणि वीर योध्याला त्याचे कुळ आपण विचारू नये. कसातरी धीर करून तो युवक काही तरी बोलणार तोच दुर्योधन आपल्या सिंहासनावरून बोलला. " कुलगुरू, शूर - वीरांचे सामर्थ्य हेच त्याचे परिचय अन्य परिचय गौण आहेत." कुलगुरू कृपाचार्य म्हणाले, " एका सामान्य, कमी दर्जाच्या व्यक्ती बरोबर राजघराण्यातील क्षत्रिय कुमार का द्वन्द्व करावे ?" त्या युवकाची आता खूप घुसमट झालेली स्पष्ट दिसत होते. तो त्या त्रासाने बोलला " हो ! हो ! हो ! मी सामान्य कुळातीलच आहे. इथल्या हस्तिनापूर नगरातील सर्व जनतेच्या, प्रजेच्या समोर सांगतो की, मी माता राधा आणि पितामह भीष्माचार्य यांचे सारथी अधिरथ याचा पुत्र कर्ण आहे."

 




अधिरथ पुत्र कर्ण

 

कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्या सर्व रंगभूमीमध्ये एकाच नाव घुमू लागले. हा तर सूतपुत्र !, याने का शस्त्र धारण केले आहे ?, निघुन जा कर्ण, तु  सूतपुत्र आहेस, चालत हो साऱ्या मैदानांत तो आवाज घुमू लागला होता. कर्ण जिवाच्या आकांतानं सांगत होता की मी का लढू शकत नाही ? फक्त सूतपुत्र आहे म्हणून ? पण त्याचा आवाज त्या गोंधळात कोणालाही ऐकू गेला नाही. एका क्षणापुर्वी कर्णचा जयजयकार करणारी प्रजा, दुसऱ्या क्षणी त्याचा धिक्कार करू लागली. तेवढ्यात रंगभूमीचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रजेमध्ये बसलेले अधिरथ गर्दीतून वाट काढत कर्ण जवळ आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्यांनी हात जोडत सम्राट यांना म्हणाले," सम्राट माझ्या पुत्राला क्षमा करा, मी याला येथून घेऊन दूर जाईन, कृपा करा पितामह, क्षमा करा." अधिरथ सारथी वारंवार विनवणी करू लागले. कर्ण म्हणाला " नाही, तातश्री मी या अर्जुनाला आज हरवून या हस्तिनापूर प्रजेला दाखवून देईन की हा सुतपुत्रच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे ते." अधिरथ बोलले " नाही कर्ण, तुझे आणि माझे आपले प्राण प्रिय असेल तर चल येथून." तेव्हा भीमसेन अभिमानाने बोलला, " निघून जा सूतपुत्र, आपल्या पिताश्रीचे म्हणणे ऐक जरा त्यांना माहित आहे की सुतामध्ये शक्ती नसते. रथाचे सारथ्य करणे आणि अश्वांचे देखभाल करणे हे तुझे काम आहे, द्वन्द्व करणे हे क्षत्रियांचे काम आहे सुतपुत्राचे नाही, हातातील धनुष्यबाण सोडून प्रतोद ( चाबूक ) घेऊन रथशाळेत जा त्वरित." भीमाच्या या शब्दाने कर्णला त्याचा अधिकच राग आला, पण तो नेहमी प्रमाणे आपला अपमान सहन करून पिताश्री बरोबर जाऊ लागला.

 




दुर्योधनने घेतली कर्णची बाजू 

 

दुर्योधन गरजला " एक राजाची योग्यता त्याच्या जन्म, धैर्य व सेनानायकत्व या तीन गुणांवर ठरवायची असते. केवळ उत्तम कुळात जन्म झाल्याने योग्यता येत नाही." मला कुलगुरू यांना एक प्रश्न विचारायचा आहे, ब्राम्हण कुळातील रावणाने आव्हान दिल्यावर क्षत्रिय कुळातील प्रभू रामाने ते का स्वीकारले ?, राक्षस कुळातील वृषपर्वा यांच्या समोर आमच्या कुळातील दुष्यन्त यांनी युध्द का केले होते ? त्यांची कुळे वेगवेगळी होती मग या शूर कर्णला का वेगळा न्याय दिला जातोय ? कारण तो एक सूतपुत्र आहे म्हणून." कुलगुरू कृपाचार्य म्हणाले " हे दुर्योधना, दशानन रावण आणि वृषपर्वा हे कोणत्या ना कोणत्या तरी प्रदेशाचे राजा होते." दुर्योधन त्यांचे वाक्य मध्येच तोडत म्हणाला " म्हणजे हा कर्ण जर कोणत्या तरी देशाचा, प्रदेशाचा राजा असेल तर तो या अर्जुनाला आव्हान देऊ शकतो बरोबर ना कुलगुरू," कुलगुरू कृपाचार्य सम्राट धृतराष्ट्र यांच्याकडे पाहत " हो, नाही " असे काही बोलायच्या आत दुर्योधन मोठ्याने बोलला " हस्तिनापूर पासून दूर असलेल्या मगध साम्राज्याच्या जवळ अंग प्रदेशाची भूमी पितामह भीष्माचार्यांनी फार पूर्वी जिंकली होती त्या जिंकलेल्या भूमीला, प्रदेशाला राजा नव्हता, म्हणून मी आज पासून कर्णला अंग देशाचा राजा बनवतो." असे म्हणून त्याने जवळ उभे असलेले सर्व सैनिकांना भराभर आदेश देऊन एक सुवर्ण सिंहासन, राजभिषेकासाठी लागणारे पवित्र नद्यांचे जल, फळ, पुष्प, गंध, वस्त्रे, सुवर्ण अलंकार, मुकुट, सोन्याच्या मोहरा, मानाची खङग, ध्वज, रथ, इत्यादी सर्व काही त्या रंगभूमीमध्येच मागून घेतले.




 

कर्णचा राज्यभिषेक 

 

काही कळायच्या आत दुर्योधनाने कर्णच्या हाताला धरून सुवर्ण सिंहासनावर बसविले जवळ उभ्या असलेल्या ब्राम्हणाला राजभिषेकाचे पठण चालू होते, पवित्र नद्यांचे जल कर्णच्या डोक्यावरून वाहत होते, दूध, दही, इत्यादींचा अभिषेक होत होता. शेवटी दुर्योधनाने आपल्या हातातील मानाच्या खङगावर आपला अंगठा बोट दाबले आणि आलेल्या रक्ताच्या थेंबाने दुर्योधन म्हणाला " मित्र कर्ण आता तू अंगदेशचा राजा झाला आहेस, या माझ्या रक्ताच्या साहाय्याने मी शपथ घेतो की मी सदैव तुझ्यासोबत राहीन." कर्णच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागले होते, तो म्हणाला " हे कुरु कुमार मी फक्त माझ्या धनुर्विद्येला मानसन्मान मिळविण्यासाठी आलो होतो आपण तर मला एक राजा बनवून टाकलात. मी या बदल्यात आपल्याला काय भेट देऊ ?" दुर्योधन म्हणाला " हे मित्र अंगराज कर्ण तू मला फक्त आपला मित्र बनव, आणि आपली मैत्री कायम अशीच अनंत काळापर्यंत टिकून राहू देत." असे म्हणून दोघेही एकमेकांनी हृदयभेट घेतली.

 

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...