पांडूचा राज्यभिषेक
महामंत्री विदुराच्या सांगण्याप्रमाणे सर्व मंत्रीगण, राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, इ. सर्वांनी मिळून एका मतांवर निर्णय झाला की, धृतराष्ट्र ऐवजी कुरु साम्राज्यावर महाराज पांडू यांचा राज्यभिषेक करावा, प्रथम पांडू राजभिषेकाला तयार नव्हते, पण सर्वांनी मिळून हस्तिनापूर राज्यासाठी गेली, अनेक वर्षांपासून हे महाराजांचे सिंहासन रिकामे पडले आहे, अशा या रिक्त सिंहासनावर शत्रूच्या आक्रमण करण्याची शक्यता जास्त असते, आणि आपल्या शिवाय दुसरा कोणीही नाहीय सिंहासनावर बसण्या योग्य. अशा सर्वांच्या विनवणी नंतर पांडू तयार झाले,
कुलगुरू कृपाचार्य मंत्र उच्चरासहित गंगेच्या शुध्द जलाने पांडूचा अभिषेक करतात, त्यानंतर पंचअमृताने पांडूचा अभिषेक करतात, राजाला शोभेल असे राजेशाही वस्त्रे परिधान करून सिंहासनावर आरूढ होत शेवटी हस्तिनापूर साम्राज्याचा सम्राटाचा सुवर्ण मुकुट पांडूच्या माथ्यावर ठेवतात, पितामह भीष्म भावी राज्याच्या हातात राजेशाही तलवार देऊन म्हणतात," हे पांडू मी आणि माता सत्यवती या हस्तिनापुरासाठी, या सिंहासनाची खुप प्रतीक्षा केली आहे, तेव्हा तु आता या राज्याचा भार आपल्या खांद्यावर घे आणि आम्हांस या बांधनातून मुक्त कर," पांडू म्हणाला,"नाही तातश्री मी या सिँहासनावर बसण्यास योग्य नाहीय, जेष्ठ भ्राता असताना मी अनूज गादीवर का बसावे ? हा अधर्म नाही का तातश्री ?" भीष्म म्हणतात, पांडू तू धर्मशील आहेस योग्य काय आणि अयोग्य काय हे तू जाणतोस पण विदुर म्हणाला तसा राजाची निवड जेव्हा करायची असते तेव्हा जेष्ठते पेक्षा गुणवत्तेला अधिक प्राधान्य द्यावे, आणि हा निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचा आहे." पांडू म्हणाला मी सिंहासनावर बसेन पण आपण आमची साथ कधीच सोडणार नाही याचे वचन द्यावे." भीष्म म्हणाले,"ठीक आहे मी या सिंहासनाचा सेवक म्हणुन काम करीन."पांडू म्हणाला,"आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला फार गरज आहे, पण तुम्ही आम्हाला सोडून जाण्याचा विचार मनातून कायमचा त्यागुन टाकावा." भीष्म म्हणाले "ठीक आहे." कुलगुरू कृपाचार्य सर्व विधी पूर्ण झाल्यावर पांडूचा राज्यभिषेक संपन्न झाला असे जाहीर करतात. तेव्हा राज दरबारातील सर्व राजपरिवार, मंत्रीगण, ऋषी-साधू गण, सैनिक, आणि हस्तिनापूर प्रजा या सर्वांनी आपल्या नवीन राजाचे स्वागत आणि जयजयकारांनी आसमंत दणाणून सोडले. अशा प्रकारे पांडूचा राज्यभिषेक संपन्न झाला.
काही दिवसानंतर गांधारचे राजे महाराज सुबल पितामह भीष्म, महाराज पांडू, आणि राजमाता सत्यवती यांच्या समोर "आम्ही आता गांधारला परत जाण्याची विनंती करण्यासाठी आलो आहे गेली काही दिवस आम्ही विवाहाच्या निमित्ताने हस्तिनापूरमध्येच आहोत, तरी आपण आम्हांस गांधारला परतण्याची महाराजांनी परवानगी द्यावी."भीष्म म्हणाले, "सुबल महाराज ठीक आहे, आपल्या राज्याची व्यवस्था नीट करून घ्यावी, पण आपणांस हस्तिनापूर राज्याची केव्हाही मदत लागली तर आपण केव्हाही सांगा आम्ही तयार आहोत." गांधार नरेश सुबल म्हणाले, "आमची मैत्री हस्तिनापूरशी आहे, तेव्हा कोणाचे धाडस होईल आमच्या गांधारकडे पाहण्याचे." तेव्हा सर्व जण हसतात. आम्ही आजच गांधारकडे प्रस्थान करू, महाराज पांडू म्हणतात, "ठीक आहे."
शकुनीची प्रतिज्ञा
या नंतर सुबल आपल्या कुठुंबासोबत गांधारला निघून जातात, पण राजकुमार शकुनी फक्त हस्तिनापूरमध्येच राहतो, शकुनी सुबल महाराजांना म्हणाला की, "जोपर्यंत मी माझ्या प्रिय गांधारीला सम्राज्ञी करत नाही, तो पर्यंत मी गांधारला येणार नाही. ज्या हस्तिनापूर साम्राज्याचा धाक दाखवून भीष्मांनी आपल्याला माझ्या प्रिय गांधारीला एका अंध व्यक्ती बरोबर विवाह करण्यास भाग पडले हा अन्याय मी कधीही सहन नाही करू शकत."अशी घोर प्रतिज्ञा शकुनीने केली.
"जोपर्यंत मी माझ्या प्रिय गांधारीला सम्राज्ञी करत नाही, तो पर्यंत मी गांधारला येणार नाही." - शकुनी .
अशा प्रकारे शकुनी सुडाने पेटला. व धृतराष्ट्र यांच्या कक्षात जाऊन त्यांची भेट घेऊन, त्यांना अतिशय खोचकपणे म्हणाला," सम्राट ! अभिनंदन हार्दिक अभिनंदन !! आपल्या भ्राताचे म्हणजे पांडूचे राज्यभिषक झाले, पांडू राजा झाला, दासीपुत्र विदुर महामंत्री झाला आणि त्यांचे जेष्ठ मात्र दास होतील." धृतराष्ट्र म्हणाले " गांधारकुमार शकुनी, आपण माझा अपमान करत आहेत." शकुनी अतिशय नम्रपणे " नाही सम्राट, अपमान तर पांडुनी केला आहे तुमचा, विदुराच्या मदतीने जेष्ठ भ्रातास सिंहासनावरून अलगद बाजूस सारून, स्वतः अनुज असून आज हस्तिनापूर साम्राज्याच्या सिंहासनावर पांडू आहे." धृतराष्ट्र म्हणाले, "शकुनी तू मला सम्राट म्हणु नकोस, कारण मी सम्राट नाही." शकुनी म्हणाला " सम्राट आपण माझे खरे महाराजे आहेत, आणि मी काय चुकतोय, राजपरिवारातील जेष्ठ पुत्रच सिहांसनावर बसतो ना, आणि आपण हस्तिनापूर नरेश होणार हे नक्की." धृतराष्ट्र म्हणाले," ते कसे काय?" शकुनी म्हणाला "ते मला आत्ताच नाही सांगता येत पण व्हाल." शकुनी त्या कक्षातून बाहेर पडून गेला आणि धृतराष्ट्र विचार सागरात बुडून गेले.
to be continued....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा