पांडूचा विवाह कोणाबरोबर झाला ?
पांडूच्या राज्यभिषेकानंतर काही दिवस सुरळीत गेले एके दिवशी राजदरबार चालू असताना एक दूत येऊन त्याने वार्ता सांगितले, दूत म्हणाला," सम्राट पांडूंचा विजय असो, मी कुन्तिभोज राज्यातुन आलो आहे, कुंतिभोज राज्यामध्ये महाराज कुंतिभोजानी आपली कन्या राजकुमारी कुंती हिचे स्वयंवर आयोजले आहे, त्यासाठी कुन्तिभोज राज्यातर्फे आमंत्रण घेऊन आलो आहे, तरी आपण स्वयंवरास उपस्थित राहावे ही कुंतिभोज कडून नम्र विनंती आहे," आशा या अचानक आलेल्या स्वयंवराचे निमंत्रण पत्र विदुरानी स्वीकारले, आणि महाराज पांडूंना विनंती केली, " सम्राट, महाराज कुंतिभोज, हे यादवांच्या कुळातील राजे, आणि आपले जर नातेसंबंध त्यांच्याशी जुळले तर अतिशय उत्तमच, कारण कुंतिभोज राज्य, आणि यादव या दोघांबरोबर आपले चांगले संबंध निर्माण होतील माझ्या मते, तर राजकीयदृष्ट्या ही योग्य संधी आहे." पांडू म्हणाला, "तातश्री, आपले काय मत आहे ?" भीष्म म्हणाले, सम्राट हा खूप सुंदर विचार आहे, दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे आपले मित्र राष्ट्र असणे, हस्तिनापूरच्या हिताचेच आहे," अशा प्रकारे सर्वानुमते पांडुनी कुंतिभोज राज्याला जाऊन स्वयंवरात भाग घ्यावा असे ठरले.
कुंतिभोज राज्याकडे प्रस्थान
सम्राट पांडू राजमाता सत्यवती, दोन्हीं माता अंबिका - अंबालिका, तातश्री भीष्म, व जेष्ठ भ्राता धृतराष्ट्र या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यासहित कुंतिभोज राज्याकडे निघाले. इकडे कुंतिभोज राज्यामध्ये स्वयंवराची पूर्ण तयारी झाली होती, सर्व राज्याचे,राजे - महाराजे, सम्राट,यांनी ती नगरीची फुलून गेली. राजवाड्यामध्ये सर्वत्र हार - फुलांच्या माळांनी फुलून गेला.
कुंतीचे स्वयंवर
सर्व राजे आपआपल्या आसनावर विराजमान झाले होते, तेवढ्यात कुंतिभोजचे राजे यदुवंशी, महाराज कुंतिभोज, सोबत यदुश्रेष्ठ महाराज शूरसेन, या दोघांच्या बरोबर मागे उभी होती ती म्हणजे कुंती. दिसायला सुंदर, पाहता क्षणी मन मोहवून टाकणारी तिचे सौन्दर्य, सर्व राजे - महाराजे, सम्राट कुंतीला पाहून अधिकच मोहित झाले. तेव्हा महाराज कुंतिभोज बोलू लागले, "आर्यावर्तात आलेले सर्व राजे - महाराजे, सम्राट, आणि राजकुमार आपण माझ्या कन्येच्या स्वयंवरास येऊन आपण माझा मन राखलात त्याबद्दल धन्यवाद, आणि आर्यावर्ताची परंपरा आहे, एक कन्येला आपल्या मना योग्य पती निवडण्याचा अधिकार आहे, तेव्हा स्वयंवरानंतर मनामध्ये कोणत्याही प्रकारची कमीपणाची भावना न राखता आपण मोठ्या मनाने वधू - वरास भावी जीवनासाठी शुभेच्या द्यावे ही नम्र विनंती आहे." महाराज कुंतिभोज कुंतीकडे पाहून म्हणाले, "जा पुत्री आपले भाग्य निवडण्याची वेळ आली आहे, तुझ्या हातातील वरमाला तुला इच्छित राजकुमार, राजे यांच्या गळ्यात घालून आपले पती निवड जा."
कुंतीचा यक्ष प्रश्न कोणता होता ?
कुंती म्हणते, "पिताश्री, मी माझा निर्णय घेण्यापूर्वी इथे उपस्थित सर्व राजे - महाराजे, सम्राट, आणि राजकुमार यांना एक प्रश्न विचारणार आहे, त्याच आधारे वर निवड करणार तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर खूप विचारपूर्वक द्यावे, योग्य आणि समाधानकारक असेल त्यालाच मी वरनार आहे." सर्व राजे लोक प्रश्न विचारा, प्रश्न विचारा असे मोठमोठ्याने ओरडू लागले. कुंती बोलु लागली, "हे आर्यजनो ! खुप विचार पूर्वक प्रश्न ऐका, महर्षी गौतम यांची पत्नी अहिल्येने इंद्राबरोबर वैवाहिक संबंध केला होता, हे समजल्यावर गौतम ऋषीने शिळा होण्याचा शाप पण दिला होता, मग प्रभु श्री रामचंद्रांनी अहिल्यादेवीचा उद्धार का केला ? प्रभु रामचंद्रानी एका अपराधीला क्षमा करून भविष्यासाठी चुकीचा संदेश तर दिला नाही ना ?" त्या राजदरबारातील एक जण उठून सांगू लागला, "हे देवी याचे उत्तर खूप सरळ आहे, भगवान राम कृपाळु - दयाळु आहेत, ते कोणत्याही अपराधील क्षमा करतात." त्या दरबारातील दुसरा उठुन म्हणाला," भगवान कृपाळु आहेत तर मग महाबली वाली आणि दशानन रावण यांना का क्षमा केले नाही ? हा पक्षपात नाही का ? या प्रश्नाचे उत्तर हे आहे की, दंडाची पण काही सीमा असते. प्रभूंना वाटले असेल की अहिल्येची पर्याप्त शिक्षा झाली आहे, त्यामुळे त्यांनी तिला क्षमा दिले असेल." आणखीन एक जण उठून बोलु लागला," नाही माझं थोडं वेगळे मत आहे, अहिल्येने शिळारूपात कित्येक वर्ष पश्चाताप केला असेल,म्हणून भगवान रामांनी क्षमा दिली असावी." पांडू म्हणाला," असत्य ! सत्य तर हे आहे की माता अहिल्याने जे संबंध इंद्राबरोबर केले ते आपल्या समोर महर्षी गौतम ऋषी आहेत असे समजुन केले होते, आणि गौतम ऋषीनीही क्रोधाने अहिल्येला शाप दिला होता. परंतु प्रभु राम राजा होते, राजाला अपराध्याला दंड देण्यापूर्वी हे जाणणे आवश्यक आहे की, दंड देण्याचे कारण फक्त चुक होती की अपराध, जर कोणतेही कार्य करताना मूळ उद्देश उचित असेल तर प्रायश्चिताची, पश्चातापाची शिक्षा पर्याप्त असते त्याला वेगळी दंडाची आवश्यकता नसते हे संपूर्ण विचार करूनच भगवान रामांनी अहिल्येला क्षमा केली असणार." या उत्तराने दरबारातील सर्वजण भारावून गेले. कुंतीला मनाप्रमाणे उत्तर मिळाले, ती आपल्या हातातील वरमाला घेऊन पांडूकडे येऊन पांडूच्या गळ्यात वरमाला घालत म्हणते," आर्य आपण स्वयंवर जिंकलात."
to be continued...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा