रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

धृतराष्ट्र यांचा राज्यभिषेक का झाला नाही ?

 

भीष्म पितामह व कृपाचार्य यांनी विद्वान, पंडितांकडून एक मुहूर्त निश्चित करून घेतला व धृतराष्ट्र यांच्या राज्यभिषेकाचा दिन ठरवला गेला आणि तो दिवस उगवला, भीष्म पहाटे गंगाकिनारी सर्व प्रात:विधी उरकून सूर्य देवाला अर्ध्य देत होते तेव्हा त्यांच्या मागे काही अंतरावर विदुर येऊन उभे राहिले होते, भीष्म आपली आराधना संपवून मागे वळतात तेव्हा त्यांना विदुर दिसला, भीष्म म्हणाले, "विदुर तु केव्हा आलास ? आणि येवढ्या प्रातःकाळी भेटण्याचे प्रयोजन ? विदुर म्हणाले, "प्रणिपात तातश्री, आपल्या आशीर्वाद, आणि मार्गदर्शनाची गरज आहे."भीष्म आश्चर्याने म्हणाले," मार्गदर्शन ते कशासाठी? तू माझा शिष्य आहेस तू कधीच चुकीचे वागणार नाही म्हणून तर आम्ही तुला महामंत्री पदावर राज्यभिषेक करणार आहोत. विदुर म्हणाले "तातश्री, जेष्ठ धृतराष्ट व पांडू हे राणीचे पुत्र आहेत आणि मी एक दासी पुत्र आहे, कधी पुढे चालून आरोप प्रत्यारोप झालेच तर त्याचे लांछन माझ्यावर येईल त्यांच्यावर नाही, भीष्म म्हणाले,"असा प्रसंगच नाही येणार." विदुर म्हणाले,"आज मी महामंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहे, माझ्या कार्यात कधी मला प्रेम किंवा धर्म यांच्यामध्ये निवड करायची झाली तर यांच्यातील कशाची निवड मी करू" भीष्म म्हणाले, हे विदुर बघ, धर्म सूर्यसमान, अन प्रेम चंद्रासमान आहे, प्रेम निवडल्यास तर तुला शितलता मिळेल आणि त्याचबरोबर घोर अंधकार सुद्धा, आणि धर्म निवडल्यास तर तुला संपूर्ण प्रकाश मिळेल, आपल्या राजपरिवारास, आणि संपूर्ण राज्यातल्या प्रजेलाही त्या प्रकाशाचा फायदा होईल, जा विदुर महामंत्री पदाची शपथ ग्रहण करून तू धर्माने वागुन, आपल्या कर्तव्याचे पालन कर जा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझे कल्याण होवो."

महामंत्री विदुर म्हणून घोषणा

इकडे पांडू, धृतराष्ट्र आपल्या दोन्ही मातांचा आशीर्वाद घेऊन राजदरबाराकडे निघतात. सर्व राजदरबार प्रकाशात उजळुन गेला, विविध फुलांच्या सुवासाने बहरून गेला, विविध राज्यातील राजे, महाराजे, सम्राट याना आमंत्रित केले होते, सर्वजण उपस्थित असताना कुलगुरू व इतर ऋषी, ब्राम्हण गण यांच्या उपस्थितीत राज्यभिषेकाचा सोहळा सुरु होतो, प्रथम महामंत्री म्हणून विदुरला आमंत्रित करतात. आणि पवित्र नद्यांचे जलाने अभिषेक करून शपथ घेण्यास सांगतात, कृपाचार्य राजतिलक लावतात, विदुर म्हणाला, "या तिलकानुसार मी माझ्या बुध्दित न्यायला स्थापित करतो", हातात जल घेऊन, "मी या जलाने सत्याचे प्राशन करतो आणि त्याचे सदैव पालन करेन." कृपाचार्य विदुरला श्वेत वस्त्र पांघरतात,"मी या श्वेत वस्त्रानुसार माझ्या जीवनात धर्माला धारण करतो, सदैव सत्याची कास धरेन." विदुरच्या डोक्यावर महामंत्रीचा मुकुट चढविला जातो, "मी या सुवर्ण मुकुटाचे धारण करून हस्तिनापूरचे स्वामित्व स्वीकारतो, आणि हा राजदंड मला आपल्या कर्तव्याप्रती मला निर्भय राहायला मदत करेल. मी सदैव माझी नातीगोती विसरून फक्त धर्माचे पालन करेन, हस्तिनापूरच्या प्रजेच्या सुख, आणि शांतीसाठी सदा संघर्ष करत राहीन याची मी प्रतिज्ञा करतो." अशा प्रकारे विदुराची महामंत्री म्हणून घोषणा होते आणि सारा तो राज दरबार त्या आरोळ्यांनी दुमदुमून जातो.

मग कृपाचार्य पांडूकडे येतात आणि अशाच प्रकारे पांडूला आमंत्रित करून जलाने अभिषेक करतात, व तिलक लावतात, पांडू म्हणतो, "या तिलकानुसार मी माझ्या बुध्दित समर्पण स्थापित करतो," हातात जल घेऊन, "मी या जलाच्या प्राशनाने संयमाला धारण करतो," कृपाचार्य पांडूला रक्तवर्णी वस्त्र पांघरतात, "मी या रक्तवर्णी वस्त्रानुसार माझ्या जिवनात शौर्यला धारण करतो," पांडूच्या डोक्यावर सेनापतीचा मुकुट चढविला जातो, "मी या सुवर्ण मुकुटाचे धारण करून हस्तिनापूरचे स्वामित्व स्वीकारतो, आणि या संरक्षक कवचाप्रती मी हस्तिनापूर प्रजेचे सदैव रक्षण करेन, आणि कठीण समयी या खड्गाप्रती सदैव संरक्षणास अग्रभागी असेन, या वंशाची आणि राष्ट्राची पताका सदैव उंच ठेविन, हस्तिनापूर राज्याची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासाठी सदैव संघर्ष करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे." अशा प्रकारे दोन्ही राजकुमारांचे राज्यभिषेक संपन्न झाले आहे असे कुलगुरू कृपाचार्यांनी घोषणा केली. आता प्रतिक्षा ही होती की, राजकुमार धृतराष्ट्र यांच्या राज्यभिषेकाची.

दोन्हीही राजकुमार यांचे राज्यभिषेक झाल्यानंतर आता मुख्य सोहळा होता तो प्रजेचे रक्षक, कुरु साम्राज्याचे उत्तराधिकारी, शांतनु - सत्यवती पुत्र विचित्रवीर्य यांच्या जेष्ठ पुत्राच्या राज्यभिषेकाची, कित्येक शतकानंतर कुरु साम्राज्याचे सिंहासन रिकामे पडले होते, त्याची आता प्रतीक्षा संपली होती, तेव्हाच राज दरबारात मोठ्याने आरोळी होते राजकुमार धृतराष्ट्र येत आहेत हो...! तेव्हा भरभक्कम शरीरयष्टीचे राजकुमार दासीच्या मदतीने, साहाय्याने येत होते, ते सिंहासनाजवळ येऊन उभे राहतात. तेव्हा कृपाचार्य त्यांच्या जवळ जाऊन कुंमकुम टिळक लावतानाच आवाज आला. 'थांबा...! पितामह ' असा आवाज दरबारात घुमला आणि दरबारातील सर्व जण त्या दिशेने पाहू लागली, तर तो आवाज होता महामंत्री विदुर यांचा, सत्यवती चिडून म्हणाली, "महामंत्री विदुर, अशा प्रकारे शुभ कार्य थांबवून अडथळा का आणलात ?" राजमाता मी आत्ताच शपथ ग्रहण केलो आहे की, मी विदुर हस्तिनापूर राज्याच्या हितासाठी, सत्य ,धर्म, आणि न्याय यांची साथ कधीच सोडणार नाही, सर्व नातीगोती माझ्यासाठी, माझ्यासाठी गौण आहेत. तेव्हा हा जो अधर्म इथे होत आहे तो मी थांबविला आहे." सत्यवती रागवून म्हणाल्या, महामंत्री इथे कोणता अधर्म होतोय ? विदुर म्हणाला,"हा राज्यभिषेक राजमाता, हा राज्यभिषेक धर्म विरुद्ध आहे, एक जन्मांध व्यक्ती राजा बनण्या योग्य नसतो," सत्यवती म्हणते, "हा कसला नियम आहे, या राज्यभिषेकाविषयी तर तुम्हाला अगोदरपासूनच माहित होते मग आत्ताच राज्यभिषेकदिनीच धर्माची आठवण कशी काय झाली ?" विदुर म्हणाले, "धर्म माणसाच्या स्थिती नुसार बदलत जातो. युवराज शकुनी बसले असता मोठमोठ्याने हसू लागले, "माफ करा महामंत्री, पण धर्म कसा काय बदलतो, बरं गांधारमध्ये तर असे धर्म परिस्थितीनुसार नाही बदलत." भिष्म गरजतात, "गांधार कुमार शकुनी हा आमचा घरगुती प्रश्न आहे. या मध्ये बोलण्याचा आपला काहीही संबंध नाही." शकुनी म्हणाले, "माफ करा महामहिम भीष्म पण मी पण आपल्या कुठुंबाचा एक सदस्यच झालेलो आहे, होणाऱ्या धुतराष्ट्र राजाला विरोध म्हणजे माझ्या बहिणीला पण विरोधच ना, मग मी माझ्या भगिनींचा पक्ष का घेऊ नये, का हा पण नियम बदलला हस्तिनापूरमध्ये." सत्यवती म्हणते "उत्तर द्या महामंत्री विदुर काय मत आहे धर्माचे या वर " विदुर म्हणाले," आपल्या जेष्ठ बंधू मध्ये कोणतेही गुणदोष पाहू नये हे त्या लहान भ्राताचा धर्म आहे. पण एक राजा निवडताना आपल्या जेष्ठ बंधू मधील त्याचे गुणदोष पाहणे हे महामंत्रीचा धर्म आहे." सत्यवती म्हणतात, "महामंत्री पण कुठुंबातील जेष्ठ पुत्राचाच अधिकार असतो," विदुर म्हणाले " बरोबर राजमाता पण जेव्हा सर्व पुत्र एक समान असतील तेव्हाच जेष्ठचा अधिकार असतो. वय आणि गुण यांचा जेव्हा विचार होतो तेव्हा गुण याचाच विचार करणे योग्य आहे राजमाता, तेव्हा एक परिपूर्ण व्यक्तीलाच राजा बनवणे योग्य आहे, अपूर्णला नाही." धृतराष्ट्र गरजले, "मी अपूर्ण कसा काय आहे, फक्त नेत्र नाहीत म्हणून मी योग्य राजा होऊ शकत नाही, राजा शिवाय महामंत्री, सेनापती, मंत्रीगण, इ. सर्व जण असतातच राज्याच्या मदतीसाठी". विदुर म्हणाले,"दृष्टी तर राजाचा सर्वात मोठा मदतनीस आहे, मंत्रिगणच्या चेहऱ्यावरचे हावभाव राजा वाचू शकत नाही, तर तो आपल्या राज्यातील छुपे शत्रू पण नाही ओळखू शकत,"

विदुर म्हणाले" राजा जेव्हा राज्यामध्ये फेरफटका मारतो तेव्हा राज्यातील लोकांचे सुख, दुःख, पीडा, अनुभवणे, प्रजेची स्थिती, हे सर्व एक जन्मांध करू शकत नाही, महामंत्री, सेनापती, मंत्रीगण, इ. सर्व जण राजाचे आदेश पालन करणारे असतात. राजाच्या मागे राहणे यांचे कर्तव्य आहे,आणि ज्या देशाचा राजा अशक्त आहे त्या देशाचे मंत्रीगण, सेनापती, इ. अभिमानी, आरेरावी करणारे होतात. तेव्हा धर्माचे हे मत आहे की एक परिपूर्ण व्यक्तीलाच आपण राजा बनवावे." शकुनी म्हणतो, "मग तो योग्य व्यक्ती आपणच आहे असेच म्हणायचे आहे ना आपल्याला महामंत्री विदुर." विदुर अत्यंत गंभीर होऊन, काट्याचे काम वृक्षाची रक्षण करणे आहे, तो फुलाचे जागा कधीच घेऊ शकत नाही. भगवान साठी, फुले वाहिली जातात, काट्याना सर्वात पहिले काढून फेकले जाते, पण मी शपथ घेतल्याप्रमाणे प्रजेच्या हितासाठी काट्याचे कर्तव्य सदैव पार पाडीन." सत्यवती म्हणतात," हे खरे आहे, की तुझी हस्तिनापूर सिंहासनाप्रती निष्ठा कळते, पण हे पद पण रिकामे ठेवता येणार नाही," विदुर म्हणाला "तेव्हा माझे मत आहे की , जेष्ठ बंधू पांडू यांचे राज्यभिषेक व्हावा.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...