पितामह भीष्म हे एक महाभारतातील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व आहे, पितृभक्ती, गुरुभक्ती, त्याग, प्रतिज्ञा, या मुळे ते आणखीनच श्रेष्ठ वाटतात आपल्या घनघोर प्रतिज्ञेने ते अजन्म ब्रम्हचारी भिष्म पितामह झाले, आपल्या पित्यासाठी सर्वस्वाचा त्याग त्यांनी केला. पण शेवट पर्यंत त्यांनी आपले हस्तिनापूर व त्याच्या सुखासाठी झटत राहिले, महाभारतात ते शांतनुपुत्र, गंगापुत्र, देवव्रत, परशुरामशिष्य, अजन्म ब्रम्हचारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
शांतनू पुत्र देवव्रत
शांतनूच्या पुत्राला गंगाने घेऊन गेल्यावर शांतनू अतिशय दुःखी होऊन गेला राजकारभारात त्याचे मन कशातच रमेना तो वनांमध्ये, गंगाकिनारी निसर्गामध्येच रमू लागला. गंगा पासून विभक्त होऊन आता खुप वर्षे लोटली होती, अशाच एके दिवशी गंगा किनारी एकांतात फिरत असताना एक विचित्र दृश्य दिसले की, गंगा ही पूर्णपणे सुकलेली,तिचा प्रवाह खूपच कमी झाला होता, ही अजब दृश्य कशामुळे झाले हे पाहण्यासाठी तो उत्तरेच्या दिशेने जातो आणि पाहतो कि, एक तेजस्वी बालक आपल्या अस्त्रविदयेच्या, बाणाच्या साहाय्याने गंगेचा प्रवाह रोखू पाहतोय, शांतनू आश्चर्याने पाहताच राहतात, मनात कित्येक विचारांचे काहुर माजले की हा कोण आहे ? हा कोणाचा पुत्र आहे ? मग हा कोण देवादिदेव महादेव कारण तेच गंगेला रोखु शकतात, या विष्णु ,या इंद्र, या कोणी देवपुत्र असावा ? असे अनेक प्रश्न मनात असताना तेथे प्रत्यक्ष गंगा प्रकट होते, व शांतनूला म्हणते स्वामी हा आपला पुत्र आहे, मी आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे याला तुमच्याकडे सोपवत आहे, तो महान महर्षी वशिष्ठ यांच्याकडुन राजनीती, महान ऋषी जमदग्नी यांच्याकडून वेदाभ्यास,जमदग्नीपुत्र भार्गव परशुराम यांच्याकडुन अस्त्रविद्या अशा सर्वगुणसंपन्न असा आपला पुत्र आहे, याचे नाव देवव्रत. असे म्हणून गंगा लुप्त झाली शांतनुने देवव्रत आपल्या कुरु साम्राज्याची राजधानी हस्तिनापूर येथे आणले तेथे मोठ्या आदर सत्कार करण्यात आला व काही दिवसांनी देवव्रत यास युवराज घोषित केले हस्तिनापूरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.(आदिपर्व अध्याय ९७ - १००).
मत्स्यकन्या सत्यवती
गंगाकिनारी नाव हाकणारे कोळी समाजाचे लोक राहत त्यातील एका कोळ्याला मासे पकडताना एक भला मोठा मासा सापडला त्याने तो घरी आणुन कापला असता त्यात एक पुत्र आणि एक कन्या मिळाली. त्या कोळ्यांनी तो मत्स्यातील पुत्र आणि कन्येला आपल्या राजाला दिला आणि झालेली सर्व घटना सांगितली, परंतु राजाने त्यातील फक्त पुत्रालाच आपल्या सोबत ठेवले कारण त्या कन्येला मत्स्याचा गंध येत होता. म्हणुन तिचे नाव मत्स्यगंधा व पुत्राचे नाव मत्स्य ठेवले,परंतु सर्व जण तिला सत्यवतीच म्हणत असे ती आपल्या वडिलांना नाव चालवण्यासाठी मदत करत असे. एके दिवशी नाव चालवताना सत्यवतीच्या नावेमधे महान ऋषी पराशर हे आले आणि सत्यवतीच्या अप्रतिम लावण्यावर मन जडले, पराशर ऋषींनी सत्यवतील विचारले असता लोक काय म्हणतील, किनाऱ्यावरील सर्व जण पाहत आहेत, तेव्हा ऋषी पराशर म्हणाले कि, तुझे कौमार्य नष्ट नाही होणार, तुझा लोकांना मत्स्याचा गंध, उत्तम सुवासात परिवर्तित होईल तेव्हापासून सत्यवतीचे नाव गंधवती, योजनगंधा असे पडले, तप सामर्थ्याने नावेभोवती धुके निर्माण केले, सत्यवतील पराशर ऋषीपासून एक पुत्र प्राप्त झाला त्याला यमुनेच्या एका बेटावर टाकले म्हणून त्या बालकाचे एक नाव कृष्ण द्वैपायन आहे, वेदाला व्यवस्थित स्वरूप दिले म्हणून वेदव्यास. पुढे हा बालक महान ऋषी रूपाने जगासमोर आले, विश्व निर्माता ब्रम्हाजी यांनी व्यासांना शिष्य करून संपूर्ण ज्ञान प्रदान केले. व्यासांनी महाभारत नावाची अप्रतिम, अद्वितीय अशी काव्यसंपदा निर्माण केली.
शांतनू व सत्यवती विवाह
इकडे देवव्रत याचा युवराज्यभिषेक होऊन तीन ते चार वर्षे लोटली, तेव्हा शांतनू गंगा किनारी भ्रमण करीत असताना त्यास एक मन मोहवुन टाकणारा सुवास दरवळत होता, हा उत्तम सुवास कोठुन येतोय हे पाहु लागला तेव्हा त्याला नावेत बसलेली कोळ्याची सत्यवती दिसली. तेव्हा शांतनुने तु कोण आहेस ? तुझे नाव काय आहे ? हा सुगंध कसा काय येतोय ? तेव्हा सत्यवतीने सर्व हकीकत सांगितली, हे ऐकुन शांतनूने विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली, पण सत्यवती म्हणाली, माझे पिताश्रीच काय ते ठरवतील शांतनू त्या धीवराकडे जाऊन आपली इच्छा सांगताच तो धीवर म्हणाला मला हा विवाह मान्य आहे पण फक्त एक अट आहे की, तुम्हाला व सत्यवतीला जो पुत्र होईल त्यालाच आपण राजा म्हणुन सिंहासनावर बसवावे. हे उत्तर ऐकुन अत्यंत उद्विग्न होऊन राजा परतला त्याचे कशातच मन लागेना. काही दिवस झाले आपले पिताश्री खुप दु:खी का आहेत याचे कारण जेव्हा अमात्याकडून समजले तेव्हा थेट देवव्रत कोळ्याचा घरी आपल्या पिताश्रीचे विवाहासाठी सत्यवतीच्या पितास विनंती केली, पण त्या पित्याने शांतनूला जे कारण सांगितले तेच कारण देवव्रतास सांगितले.
देवव्रत ते भीष्म
देवव्रतानी क्षणाचाही विलंब न लावता त्या धीवराला म्हणाले,
राज्यां तावत्पुर्वमेव मया त्यक्तं नराधिपा: l
अपत्य हे तोरपिच करि श्येढ्य विनिश्चयं l
अध्यप्रभुति मे दाश ब्रम्हचर्य भविष्याति ll (आदिपर्व अध्याय ८५ - ९८)
राज्यावरचा माझा हक्क मी आत्ताच सोडुन दिला आहे, पण मला पुत्र होऊन त्यांच्यामुळे सत्यवतीच्या मुलांना राज्य मिळिवण्याच्या कामी विघ्न येईल, अशी तुम्हाला शंका आहे तिचेही निरसन मी आत्ताच करतो. मी आजपासुन मरेपर्यंत ब्रम्हचर्याने राहिन हे तुम्हांला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. अशी घनघोर प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा केल्या नंतर अवकाशातुन पुष्पवृष्टी होऊ लागली, तेव्हा पासुन देवव्रताचे नाव भीष्म झाले, सत्यवतीला माता मानुन या प्रतिज्ञेनंतर भीष्म हस्तिनापुरी येवून आपल्या पिताचे विवाह लावून देतात. ही पितृभक्ती पाहुन शांतनूला खूप आंनद होतो, तेव्हा ते पितृभक्तीच्या बदल्यात भीष्माला ईच्छामृत्यू वरदान देतात. पुढे शांतनू व सत्यवती यांच्यापासुन चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र प्राप्त झाले. काही वर्षातच शांतनूचा मृत्यू होतो, तेव्हा भीष्माच्या छत्रछायेखाली जेष्ठ चित्रांगद यास हस्तिनापूर गादीवर बसवुन आपला राजकारभार पाहू लागले. पण अचानक बातमी येते की चित्रांगद नावाचा गंधर्व हस्तिनापूर राज्यावर चालून येत आहे, तेव्हा जराही विलंब न करता महाराज चित्रांगद आपली सेना घेऊन कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर लढाई झाली, ही लढाई तीन वर्षे झाली, त्यात सरस्वती नदी किनारी शांतनुपुत्र चित्रांगद यांचा मृत्यू झाला, यामुळे हस्तिनापूरमध्ये शोककळा पसरली, त्यातून सावरत सत्यवती व भीष्मांनी दुसरा शांतनुपुत्र विचित्रवीर्य यास अल्पवयातच गादीवर बसवले.
to be continued....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा