काशीराज कन्याचे हरण
कुरु साम्राज्याचा राजा विचित्रवीर्य यास राज्यभिषेक करून काही वर्ष लोटली असताना, राजमाता सत्यवती भीष्माकडे येऊन म्हणतात कि, आपण या हस्तिनापूरचा आता आपल्या सर्व आशा या विचित्रवीर्यावर टिकुन आहे, त्याचे वंशवेल वाढविण्यासाठी, पुत्र विचित्रवीर्य याचे विवाह करणे आवश्यक आहे, आपल्याला काशीराज यांनी त्यांच्या तीन कन्याचा स्वयंवर योजिला आहे. त्याचे निमंत्रण आलेले आहे, तु जाऊन त्या तिन्ही कन्येचे हरण करून आपल्या बंधूचे विचित्रवीर्यचे कल्याण कर,
ही कल्पना भीष्मांना अजिबात आवडली नाही पण हा राजमातेचे आदेश आहे. असे म्हटल्यावर भीष्म काशीकडे प्रस्थान केले, इकडे काशीमध्ये तिन्ही म्हणजे अंबा, अंबिका, आणि अंबालिका राजकन्येचे जोरदारपणे स्वयंवराची तयारी चालु होती. आर्यावर्तातील सर्व राजकुमार, राजे, महाराजे, सम्राट, याना आमंत्रित केले होते. काशीराज यांची जेष्ठ कन्या अंबा हिने मार्तिकावत देशाचा राजा शाल्व याला मनोमन वरले होते. या स्वयंवरात ती राजा शाल्व यांच्याच गळ्यात वरमाला घालणार होती हे ठरलेले होते.
स्वयंवरातला पराक्रम
काशीराज यांनी सर्व आलेल्या राजे, राजकुमाराचे स्वागत केले, व म्हटले की, "मी माझ्या कन्येचे स्वयंवर (स्वतःच वराचे निवड करणे) आरंभले आहे, माझी तिन्हींही कन्या योग्य वराच्या गळ्यात पुष्प माला घालेल, पण बाकी जणांनी राग न मानता त्यांच्या भावी जीवनासाठी शुभ कामना द्याव्यात हीच माझी या दरबारातील सर्वांना विनंती आहे, आपल्या कन्याकडे पाहुन जावा आपले भविष्य निवडा". तिनही कन्या जाणार तेवढयात घोषणा झाली की, हस्तिनापूर नरेश देवव्रत भीष्म येत आहेत हो...! या आरोळीने दरबारात कुजबुज होऊ लागली, काही लोक म्हणु लागले, बघा वार्धक्यात लोक कुठे जायचे तर हे लोक कुठे चाललेत?...! केस पांढरे झाले पण विवाह करण्याची हौस काय जात नाही...! यांनी तर ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली होताना त्याचे काय झाले?... !
पण ही फक्त कुजबुजच राहिली, कारण भीष्मांचा दरारा इतका होता की, त्यांच्या विरुद्ध लढणे तर सोडाच पण बोलणे पण अवघड होते, कारण आर्यावर्तात असा एकही धनुर्धर नाही जो भीष्मासोबत युध्द करू शकेल. दरबारात प्रवेश करताच त्यांनी सर्व राजांना आव्हान दिले की, मी गंगापुत्र भीष्म, हस्तिनापूर नरेश विचित्रवीर्य यांचा प्रतिनिधी म्हणुन या तिनही कन्येचे हरण करत आहे, जर कोणाला याविषयी अडचण असेल त्यांनी माझ्याशी युद्ध करून त्यांना सोडणून न्यावे. त्या दरबारातील एकही वीर, योद्धा भीष्मांसोबत लढण्यास तयार होईना तेव्हा भीष्मांनी तिनही काशीराजकन्यांना रथावर बसण्याची आज्ञा केली.
शाल्व - भीष्म युध्द
भीष्मा सोबत ते तीनही राजकन्या रथामध्ये बसतात, पण त्यातील अंबा मात्र वाटे की,शाल्व राजा येईल आणि आपल्याला सोडवून घेऊन जाईल, भीष्मांचा रथ नगराबाहेर पडताच समोर राजा शाल्व आणि त्यांची सेने उभी होती, परंतु त्या परशुराम शिष्याने त्या सेनेचा पराभव करून शाल्वला जायबंदी केले, तेव्हा तीनही राजकन्येसोबत भीष्म हस्तिनापूर नगरात प्रवेश करतात, त्यांचे खूप थाटात स्वागत होते.
विचित्रवीर्य सोबत विवाह करताना अंबा सांगते की, हे कुरु साम्राज्य रक्षक भीष्म, मी मार्तिकावत नरेश महाराज शाल्व यांना मनोमन वरलेली आहे, या स्वयंवरात मी त्यांनाच वर म्हणून निवडणार होते, भीष्म म्हणाले हे अंबे तु माझे व शाल्व युध्दाच्या वेळीच का नाही सांगितलंस तेव्हाच मी तुला मुक्त केले असते. अंबा म्हणाली की कदाचित शाल्व आपल्याला हरवुन मला मुक्त करून घेऊन जाईल असे वाटले होते. भीष्माने लगेच एक रथ तयार करण्यास सांगितले आम्ही तुला शाल्व कडे पाठविण्याची सर्व तयारी करू, आणि एक वडिलकीच्या नात्याने योग्य उपहार सुद्धा देवू, असे म्हणून अंबाला शाल्वकडे पाठवुन देण्यात आले, आणि अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्य सोबत संपन्न करण्यात आला.
तु एक जिकंलेली वस्तु आहेस.
राजकुमारी अंबा मार्तिकावत नरेश महाराज शाल्व यांच्याकडे जाते पण ते तिचा स्वीकार नाही करत, कारण शाल्व म्हणाला की, "कोणीतरी दुसर्यांनी तुला जिकंलेले असताना मी तुझा स्वीकार कसा करेन, ज्याने तुला जिंकले त्यांनाच तुझ्या संबंधी सर्व निर्णय घेता येतात, त्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही," अशा बोलण्याने नाराज होऊन अंबा परत हस्तिनापुरात येते व भीष्म व सत्यवती यांना म्हणते " हे राजमाता मला न्याय द्या, ज्याला मी मनोमन वरले तो माझा स्वीकार नाही करत कारण माझे हरण झाले आहे म्हणून, पण ज्याने माझे हरण केले त्याला तर तुम्ही माझा स्वीकार करण्यास सांगू शकता राजमाता"..! भीष्माकडे पाहुन, "एकदा स्त्रीचे हरण झाले असता त्या स्त्रीला परत आपल्या वडिलांच्या घरचे दरवाजे बंद असतात भीष्म, तुम्ही माझे हरण केलात तेव्हा आपणच माझा स्वीकार करावा अन्यथा दुसरा कुणीही नाही," तेव्हा भीष्म म्हणतात," हे देवी अंबा मी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली आहे." अंबा म्हणते, "तेच तर मी तुझी प्रतिज्ञा मोडण्यास आली आहे. प्रतिज्ञा मोडली म्हणजे जिवंतपणी नरक यातना मिळते तिच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे." सत्यवती म्हणतात," हे अंबा, तुला हवे असल्यास आम्ही विचित्रवीर्यासोबत विवाह करुन हस्तिनापूर सम्राज्ञी होण्याचा मान तुला मिळवून देऊ." अंबा म्हणते, "मला फक्त भीष्म यांच्याशीच विवाह करायचा आहे, जर ते करणार नसतील तर ज्या हस्तिनापूर साम्राज्याच्या बळावर, तुझ्या सामर्थ्यावर आम्हाला जिंकलस, आणि माझ्यावरील अन्याय केलेस त्या विरुध्द न्याय मागेन, मी अंबा आर्यावर्तात सर्व राजांना एकत्र करेन आणि याच हस्तिनापुरासमोर भलीमोठी सेने उभी करेन, तेव्हा तुझा अहंकार नष्ट झालेला मी पाहेन भीष्म." भीष्म म्हणतात हे देवी, संपूर्ण आर्यावर्तात माझ्या विरुद्ध कोणीही युद्ध करणार नाही, तेव्हा आपण माझे भगवान, गुरु परशुराम याच्या जवळ जाऊन, त्यांना हे सांगा जर मी दोषी असेन तर मला दंड देण्याची योग्यता फक्त त्यांच्यातच आहे.
भीष्मांना परशुरामाचे युध्दाचे आव्हान
तेव्हा अंबा सरळ गुरू परशुराम यांच्याकडे जाते झालेला सर्व प्रकार त्यांना सांगते, तेव्हा परशुरामांना सुध्दा तिच्या सांगण्यात विश्वास वाटत नाही, त्यांना आपल्या शिष्यावर पूर्ण विश्वास असतो, परशुराम म्हणतात जर भीष्म चुकला असेल तर मला माझ्या दिलेल्या विद्येवर संशय आहे, जर चुकला असेल तर त्याला शिक्षा मी देईन, असे म्हणुन परशुरामांनी आपल्या शिष्याकडे युध्दाचे आव्हान देणारा संदेश पाठवतात, भीष्म परशुरामांना जाऊन युध्द भूमीवर भेटतात, भीष्म आपल्या रथात सर्व शस्त्र - अस्त्र सुसज्य युध्दाच्या वेशात येतात पण इकडे भगवान परशुराम युद्धसाठी पायी चालत येतात, हे पाहुन भिष्म गुरु परशुरामांना प्रणाम करण्यासाठी येतात तेव्हा परशुराम बोलतात की," तु आशीर्वादाच्या योग्य आहेस की नाही आधी निर्णय होऊ दे, कारण दोषींना आशीर्वाद देणारा पण त्या दोषाचा भागीदार असतो भीष्म"!,भीष्म म्हणाले, "भगवान परशुराम तुमच्या मनात मी चुकीचा वागेन हे जेव्हा आले तेव्हाच मी आपला अपराधी झालो." परशुराम म्हणाले, "मी कुठे म्हणालो की माझ्या मनात तुझ्या विषयी संशय आहे प्रिय शिष्या, पण अंबाच्या मनाच्या समाधानासाठी मी तुझी परीक्षा घेणार आहे. माझ्या बरोबर युध्द कर आणि जगाला दाखवुन दे की, तु सर्व कार्य धर्माने करत आहेस, धर्माने वागणारा माझा शिष्य कधीही माझ्याकडून हरणार नाही,"
भिष्म - गुरु परशुराम भयंकर युध्द
गुरु परशुराम व भीष्म यांचे भयंकर युध्द आरंभ होते व हे युद्ध २३ दिवसापर्यंत चालते, शेवटी दोघेही अटीतटीची युध्द चालू होते. परशुराम आपला महाभयानक परशु चालवतात आणि भीष्म आपल्या कडील ब्रम्हास्त्र चालवतात, तेव्हा अवकाशात सर्व देवदि, नारद, महर्षी एकत्र येऊन दोघांनाही आपले अस्त्र परत घेण्याची विनंती करतात आपल्या या युद्धाने पृथ्वीचा विनाश होईल, तेव्हा हे युध्द थांबवा. भीष्म आणि परशुराम हे देवांच्या वचनाचा मान ठेऊन दोघेही आपआपले अस्त्र परत घेतात, तेव्हा अंबा परशुरामास म्हणते, भगवान मला तुमच्याकडे न्याय मिळेल याच आशेने आली आहे, अजुन मला न्याय नाही मिळाला. तेव्हा परशुराम म्हणतात, हे देवी, अंबा तु माझे गुरु, आराध्य भगवान महादेव यांची आराधना कर तुला ते न्याय जरूर देतील," तेव्हा अंबा भगवान, देवादिदेव महादेव यांची कठोर उपासना करू लागली, ती तपाने अतिशय कृश झाली, तिने अन्न, पाणी, यांचा त्याग करून फक्त वायु भक्षण करू लागली, पुढे महादेव प्रसन्न होऊन तिला तिच्या मनासारखा वर देतात. की तु पुढच्या जन्मी भीष्माच्या वधास कारणीभूत होशील, महादेव तथास्तु म्हणुन अंतर्धान पावतात, अंबा म्हणते," हे भीष्मा, मी आता माझे जीवन संपवत आहे, मी परत येईन, तुझी मृत्यु बनुन," मग अंबाने स्वतःची लाकडी चिता रचुन त्यामध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवते.
to be continued....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा