गांधारी - धृतराष्ट्र विवाह
गांधारराज सुबल आपल्या गांधार राज्याची नीट सुरक्षा व्यवस्था करून संपूर्ण कुठुंबासोबत हस्तिनापूरमध्ये गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या विवाहासाठी येतात, तेव्हा या राजपरिवारातील सर्वांची देखभालीची व्यवस्था राजमहालातिल अतिथी राजमहालात केली होती तेथे त्यांच्या सोबत त्यांची सहचारिणी महाराणी सुदर्भा, गांधार राजकुमार शकुनी, गांधारीची अत्यंत जवळची दासी सुकदा ही पण होती, राजकुमार शकुनी याला धृतराष्ट्र जन्मांध आहेत हे माहित होते पण राजकुमारी गांधारीला या विषयी काहीच माहित नव्हते की तो राजकुमार दिसायला कसा असेल, वागायला कसा असेल, हे असे कित्येक प्रश्नाने तिच्या मनात उत्सुकता, आनंद याची सीमा नव्हती, पण ती जेव्हा हस्तिनापुरी येते तेव्हा तिला कळते की आपला विवाह ज्या राजकुमारासोबत होणार आहे तो जन्मापासूनच अंध आहे, हे जेव्हा तिला कळते तेव्हा तिला खुप दुःख होते, मनात भगवान शंकरास प्रार्थना पण करते, मलाच का एवढे दुःख, माझ्याच नशिबी असे का भाग्य, असो माझे माता - पिता नी जे माझे भाग्य लिहले आहे तेच होणार आहे, आपल्या माता- पितांची मजबुरी तिला समजते, पण लगेच मनाला दृढ करून सावरून ती विवाहास तयार होते.
हस्तिनापूरमध्ये सर्वत्र आनंदाचे, उत्सवाचे वातावरण होते, ज्याठिकाणी गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या विवाह होणार होता तो राजमहाल माळ फुलांनी उजळून निघाला होता. राजमहालाच्या बरोबर मध्यभागी सर्व ऋषी मुनी, साधु, आचार्य, महर्षी, कुलगुरू कृपाचार्य सहित सर्व यज्ञामध्ये मंत्र उच्चर करीत होते, तेव्हा राजमहालामध्ये पहारेकऱ्यांनी ललकारी दिली की, "गांधारराज सुबल आपल्या कुठुंबासोबत येत आहेत हो...!" राजमहालात गांधारराज सुबल सहित गांधारीचे प्रवेश होतो, मग काय महालातील सर्वच ' आ ' वासुन उभे राहिले, मात्र धृतराष्ट्राला काहीच कळेना की या मंडपामध्ये एवढा भयाण शांतात कशामुळे झाली असावी, तेव्हा राजमाता सत्यवती म्हणतात, " थांबा ! हा काय प्रकार आहे?, या गांधारीच्या डोळ्यावर पट्टी का लावलेली आहे ", महाराज सुबल म्हणतात,"माझ्या कन्येला माफ करा राजमाता, पण तिने तर प्रतिज्ञा केली आहे कि, संपूर्ण जिवनभर अशी पट्टी ती डोळ्यावर बांधेन." सत्यवती म्हणतात "पण का? हा असा आमचा अपमान कशामुळे ?" गांधारी म्हणते, "माफ करा राजमाता पण मला आपला अपमान नाही करायचा पण माझे होणारे पती जर ह्या जगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, तर मी का त्याचा आस्वाद घ्यावा, त्यांना ज्या अडचणी आल्यात त्या मी पण स्वीकारल्या आहेत." भीष्म म्हणतात,"पुत्री गांधारी, कुरु कुमारसाठी, धृतराष्ट्रासाठी अशा साथीदाराची आवश्यकता आहे की, जी त्यांचे डोळे बनेल." गांधारी म्हणते,"तातश्री, माझे आर्य, जे पाहु शकत नाहीत, जे अनभवू शकत नाही, ते पाहण्याचा, अनुभवण्याचा मला काहीही अधिकार नाही आणि एक अंधच दुसऱ्या अंधाच्या मनातील भावना तसेच सुख - दुःख जाणून घेऊ शकतो, त्यामुळेच मी माझ्या डोळ्यावर ही पट्टी बांधली आहे जन्मभरासाठी." भीष्म म्हणतात," पुत्री गांधारी, प्रतिज्ञा करण्यापूर्वी विचारविमर्श करणे आवश्यक होते". गांधारी विनम्रपणे म्हणते," विचारामध्ये कपट असू शकते, पण प्रतिज्ञांमध्ये शुध्द भाव असतो, त्याच शुध्द भावनेने मी प्रतिज्ञा केली आहे, पण मी मूढ प्रतिज्ञेबद्दल काय बोलणार, माझ्या पेक्षा (भीष्मच) तातश्री, आपणच प्रतिज्ञेबद्दल अधिक जाणतात." या वाक्यानेच संपूर्ण विवाह सभागृहाला गांधारीने जिंकून घेतले, विवाहाला आलेली जनताच राजकुमारी गांधारीचे विजय असो, विजय असो..! असे मोठमोठ्याने ललकाऱ्या देऊ लागले, अशा प्रकारे सारा विवाह मंडप त्या जयजयकाराने दुमदुमून गेला.
तेव्हा भीष्म कुलगुरू कृपाचार्य यांना विचारतात, "कुलगुरू कृपाचार्य खूप कठीण प्रसंग आहे, यावर शास्त्र काय सांगते ? गांधारीने जे केले आहे त्यावर काही मार्ग किंवा उपाय आहे का ?या वर आपले मत काय आहे? इतर ऋषी मुनी यांचे मत मी जाणून घेऊ इच्छितो." कुलगुरू कृपाचार्य म्हणतात, हे भीष्म, प्रतिज्ञा हा काय शास्त्राचा भाग नाहीय, प्रतिज्ञा ही कधीही आपल्या परंपरेच्या विरुद्ध असते, पण ती नवीन मार्ग निर्माण करते. पुढे हिच प्रतिज्ञा काळानुसार परंपरा बनते. गांधारीची बाजू आपण ऐकली त्यात तिची आपल्या होणाऱ्या पतीबद्दल समर्पणाची भावना दिसत आहे. पातिव्रतेचे ती सदैव पालन करून तिचे नाव एक महान पतिव्रता स्त्री म्हणून अनंत काळापर्यंत घेतले जाईल. तेव्हा धृतराष्ट्र यानेही आपला पती धर्म पळून गांधारीचे त्याच समर्पण भावनेने पाणिग्रहण करून स्वीकार करावा, त्यातच कुरु कुळाचे कल्याण होणार आहे.
तेव्हा सर्वांच्या सहमतीने विवाहास प्रारंभ होतो राजमाता सत्यवती, भीष्म, अंबिका, आणि अंबालिका या दोन्ही माता, कुलगुरू कृपाचार्य, पांडू, विदूर, महामंत्री वृषपर्वा, आर्यावर्तात आमंत्रित राजे, महाराजे, सम्राट आणि अनेक ऋषी, मुनी, ब्राम्हण, हस्तिनापूर मधील विवाहास आलेली जनसमुदाय या सर्वांच्या साक्षीने धृतराष्ट्र - गांधारी यांचा विवाह संपन्न होतो.
पण पुढे काही दिवस धृतराष्ट्र व गांधारी यांच्यातील संबंध चांगले नव्हते पण शकुनी, धृतराष्ट्रास पटवून देतो की, महाराज, माझ्या प्रिय भगिनीपासून आपला खूप मोठा फायदा हा होणार आहे की, ती तुम्हाला १०० राजपुत्र देणार आहे, तो तिला भगवान महादेवांचा आशीर्वाद स्वरूपात मिळाला आहे, १०० राजपुत्र पुढे चालून ते तुमचे डोळे होतील, आणि हे २०० डोळे फक्त हस्तिनापुरवरच नाही तर संपूर्ण आर्यावर्तावर लक्ष्य ठेवून आपले अधिराज्य स्थापित करतील तेव्हा आपणच माझ्या प्रिय भगिनींचे आभार मनाल, तेव्हा तिचा मनःपूर्वक स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे महाराज " या वाक्याने धृतराष्ट्राचे डोळे अधिकच मोठे झाले ही गोष्ट अधिक प्रमाणात त्यास पटली अशा प्रकारे धृतराष्ट्र व गांधारी यांच्यातील संबंध शकुनीच्या माध्यमाने सुधारले जाते.
काही काळानंतर पांडू व विदुर यांची विवाहाची चर्चा होते पण प्रथम धृतराष्ट्राचा राज्यभिषेक व्हावा नंतर त्यांच्या विवाहाचे पाहू असे सत्यवती म्हणते व त्या विषयावर पडदा पडतो.
हा विवाह होऊन काही दिवस झाल्यानंतर राजमाता सत्यवती, भीष्म यांच्याकडे येतात, व बोलतात " हे भीष्म, सध्याची परिस्थिती पाहता आपल्या कुरु कुळाचे सिंहासन रिक्त ठेवून चालणार नाही. खूप काळापासून कुरुकुलाचे सिंहासन रिक्त आहे. एखाद्या राज्याच्या राजा नाहीय हे पाहुन शत्रू राष्ट्रचा त्या राज्यास धोका अधिक असतो."आता जेष्ठ पुत्र धृतराष्ट्र याचा विवाह पण झाला आहे तेव्हा त्यास राज्यभिषेक करून राजा, पांडुस सेनापती, आणि विदुरास महामंत्री करून टाकावे असा माझा मानस आहे, तुझा काय विचार आहे या बद्दल ?" भीष्म म्हणतात, "राजमाता, या बद्दल माझी काही एक तक्रार नाहीय, पण विदुरास महामंत्री म्हणून धृतराष्ट्र नियुक्ती करेल का नाही याची शंका आहे.?"राजमाता म्हणतात," तेव्हा आपण धृतराष्ट्राच्या राज्यभिषेकाच्या अगोदर महामंत्री म्हणून विदुरास आणि पांडुस सेनापती यांचाच अभिषेक करून टाकू, म्हणजे तो त्यांचा विरोध करणार नाही, योग्य आहे ना, मग एक योग्य मुहूर्त पाहून आपण त्यांचं राज्यभिषेक करून देऊ." भीष्म आनंदून म्हणाले, "योग्य निर्णय आहे राजमाता, मी आत्ताच जाऊन कुलगुरू कृपाचार्य यांच्याशी बोलून लवकरात लवकर मुहूर्त ठरवून घेतो." असे म्हणून भीष्म त्या कक्षाबाहेर पडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा