आश्रमातील परीक्षा
एके दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची ठरवली, सर्व कुमारांना त्यांनी आश्रमातील मुख्य मैदानात यायला सांगितले व एक एक धनुष्य देऊन प्रत्ययांचा (धनुष्याची दोरी) चढवून बाण सोडण्याच्या स्थितीत उभे राहावयास सांगितले, आणि समोर दूरवर एका वृक्षाच्या शाखेला दोरीच्या साहाय्याने एक लाकडाचा पक्षी लटकावला होता, द्रोणाचार्यांनी सर्व प्रथम दुर्योधनाला त्या पक्षाच्या डोळ्यावर लक्ष्य साधण्यास तयार होण्यास सांगितले व विचारले,"बोल वत्स दुर्योधना, तुला काय दिसतंय?" दुर्योधन बोलला,"मला झाड दिसतायेत. "द्रोणाचार्य बोलले, "आणखी काय दिसतंय, दुर्योधन बोलला मला दूरवर उंच डोंगरे पण दिसतायेत." द्रोणाचार्य म्हणाले, "बाजूला ये दुर्योधन. !" भीम, तू ये शरसंधनास तयार हो, भीम आपला पवित्रा घेताच द्रोणाचार्यांनी विचारले, "भीमा, तुला काय दिसतंय ?" भीम म्ह्णाला,"आचार्य, मला झाड दिसतंय," द्रोणाचार्य म्हणाले," आणखी काय दिसतंय?" भीम आपली जिव्हा ओठावरून फिरवर म्हणाला, " मला आणखी झाडावरचे गोड फळे दिसतायेत, असे बोलताच सर्व शिष्य मोठमोठ्याने हसु लागले. "आचार्य बोलले, बाजूला ये असे एक - एक करून सर्व शिष्य झाले कोणी बोलले झाड दिसतंय, कोणी बोलले फांदी दिसतंय, कोणी बोलले पाने दिसतंय, कोणी बोलले लाकडाचा पक्षी दिसतंय, शेवटी अर्जुनास शरसंधान करावयास तयार राहण्यास सांगितले व तोच प्रश्न विचारला कि, बोल अर्जुना ! तुला काय दिसतंय, अर्जुन बोलला,"आचार्य, मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय." आचार्य बोलले,"आणखी काय दिसतंय ?"अर्जुन धीराने बोलला, "आचार्य, मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळाच दिसतोय." द्रोणाचार्य आनंदी होऊन म्हणाले, सोड बाण, आणि अर्जुनाने बाण रोखलेल्या लाकडी पक्ष्याच्या बरोबर डोळ्यामध्ये आपला निशाणा साधला.
द्रोणाचार्य म्हणाले, " पाहिलेत शिष्यानें या वरून तुम्ही काय शिकलात तर आपण आपल्या लक्ष्यावर एवढे मन एकाग्र केले पाहिजे की आपणास दुसरे काहीही दिसले नाही पाहिजे. जीवनाचेही असेच आहे तुम्ही एक लक्ष आपल्या मनात तयार करा आणि ते मिळवण्याचा पुरेपूर प्रयन्त ही करा तेव्हाच त्याचे फळ आपणास मिळेल."
अशा प्रकारे शिष्याची परीक्षा झाली. या वरून शिष्याची एकाग्रता, शस्त्रांचा सराव आणि अभ्यास हे समजले.
सूतपुत्र म्हणून कर्णला डावलले
असेच गुरुकुल मधील काही दिवस जात होते, गुरु द्रोणाचार्य एका वृक्षाखाली वेगवेगळ्या प्रकारचे युद्धनीती बद्दल माहिती देत होते आणि सर्व शिष्य खाली बसून द्रोणाचार्यांचे विचार ग्रहण करत होते. तेव्हा अचानक हस्तिनापुराहून एक रथ धुळीचे लोळ उडवीत गुरुकुलाच्या दिशेने आला. तो आश्रमाच्या मुख्य द्वाराजवळ थांबला. सर्व शिष्य कुतूहलाने त्या दिशेने पाहू लागले. तेव्हा एक शिष्य धावत येऊन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला " आचार्य हस्तिनापुराहून भीष्म सारथी अधिरथ आपल्या पुत्रासमवेत आले आहेत आपली भेट घेण्यासाठी " द्रोणाचार्य म्हणाले " ठीक आहे त्यांना आपल्या कुटीत घेऊन ये." आपल्या शिष्यानंकडे पाहत म्हणाले आज जे मी शिकवलेल्या युध्द कलेचा अभ्यास, सराव सातत्याने करा." असे म्हणून निघून गेले.
द्रोणाचार्य आपल्या कुटीत जाताच अधिरथ सारथी आणि त्यांचा पुत्र द्रोणाचार्याना प्रणाम करून म्हणतात, " हे आचार्य आपण हस्तिनापूर नगरात येऊन कुरु कुलातीलच नाहीतर जे आपल्या गुरुकुलात शिष्य म्हणून विद्या ग्रहण करतील त्यांचे जीवन आपण धन्य करून टाकलेत." द्रोणाचार्य अधिरथाच्या पुत्राच्या कानाकडे पाहत म्हणले " अधिरथ आपण येण्याचे प्रयोजन ?" अधिरथ आपल्या पुत्राकडे हात करत म्हणाले " आचार्य हा माझा पुत्र राधेय कर्ण आहे, याला धनुष्य बाण, युद्धकला ग्रहण करण्याची फार आवड आहे. आपण याला आपला शिष्य करून घ्यावे हीच आशा आहे." द्रोणाचार्य म्हणाले " अधिरथ हा पुत्र एक सूत आहे, आणि सुतांनी फक्त रथाचे सारथ्य करावे, युध्द हे क्षत्रियांचे काम आहे. सूतांनी युध्दकला, धनुर्विद्या शिकुन काय लाभ होईल." तेव्हा कर्ण म्हणाला " आचार्य आपण परशुराम शिष्य, आपले गुरु हे जन्माने ब्राम्हण असून ते युद्धकला शिकले आणि इतरांनाही शिकविले. आपण ब्राम्हण असून युद्धकला शिकलात आणि पुढे आपला पुत्रही ब्राम्हण असून त्यालाही आपण युद्धकला कशासाठी शिकवीत आहात ?" द्रोणाचार्यांना त्या सुतपुत्राचा भयंकर क्रोध आला, द्रोणाचार्यां म्हणाले " अधिरथ आपण त्वरीत प्रस्थान करावे मी या सुताचा शिष्य म्हणून स्विकार नाही करू शकत." कर्ण म्हणाला " टीक आहे आचार्य, मी आपल्या गुरुकडून धनुर्विद्या ग्रहण करेन तेव्हाच येईन." तेव्हा असे म्हणून कर्ण समवेत अधिरथ हस्तिनापुराच्या दिशेने निघून गेले.
अर्जुनाचा शब्दभेदित्वाचा सराव
एके दिवशी आश्रमामध्ये सायंकाळी भोजन समयी सर्व शिष्य पंगतीमध्ये जेवताना प्रकाशासाठी दीप लावला होता तोच वाऱ्याची एक झुळूक येऊन तो दीप विजला, आणि सर्वजण भोजन करण्याचे थांबले पण भीमाला भूक सहन न झाल्याने तो अंधारातच जेवण जेवत होता, मग एका शिष्याने तो दीप परत एकदा प्रज्वलित केला तेव्हा सर्वांनी भोजनास सुरुवात केली, आणि अर्जुनाने पहिले की, भीमाचे तर भोजन समाप्त झाले आहे. भोजन झाल्यावर भीमाला अर्जुनाने विचारले कि," भीम दादा आपण अंधारात पण बरोबर कसे काय भोजन करता ? काय आश्चर्य आहे ?" भीमाने हसून उत्तर दिले की, " त्यात काय आश्चर्य आहे अर्जुन, दररोज तर जेवतो पात्रातील घेतलेला पदार्थं माझ्या हाताने, माझ्याच मुखात जाणार ना ?, हे सरावानेच शक्य आहे." भीम जेव्हा सरावाने शक्य आहे असे जेव्हा म्हणाला तेव्हा अर्जुनाला एक युक्ति सुचली की जर सरावाने भीम अंधारात पण भोजन करू शकतो, तर मी पण काळोखात धनुष्यबाणाने अचूकलक्ष्य भेद करू शकतो. आणि तेव्हापासून अर्जुन (लक्षवेधी) शब्दवेधीत्त्वचा सराव करू लागला व त्यात तो थोड्याच काळात प्रविण पण झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा