कौरव - पांडवांची द्रोणांसोबत भेट
गुरु द्रोणाचार्यांची भेट
एकदा राजभवनाच्या एका वाटिकेजवळच मैदानामध्ये सर्वराजकुमार खेळ खेळताना त्यांचा चेंडू मैदानाजवळील एका विहिरीत पडला, आणि सर्वजण चिंतेत पडले कि हा चेंडू कसा काढावा? सर्व प्रयत्न करून झाले पण चेंडू काही केल्याविना नाही काढता आला शेवटी थकुन निघणार तेवढयात भीमाच्या कानापासून काहीतरी गेल्याचा भास झाला विहिरीत पाहतो तर एक दर्भाची काडी चेंडूंमध्ये रुतली होती, कोणीतरी धनुष्याने बाण मारावा असा भास झाला. सर्व कुमार पाठीमागे वळून पाहू लागले तर दूर एका उंच वृक्षाखाली एक महापुरुष, जटा वाढलेले, भगवावेश धारण केलेले, संपूर्ण शरीरावर भस्म लेपले, पायी खडावा घातलेले मुनिवर्य उभे होते, वस्त्रांवरून गरीब ब्राम्हण वाटत होते, एका हातात कमंडलू दुसऱ्या हाताने एक - एक करत दर्भाची काडया (इषिका - नावाची गवताची काडी) तोडून फेकत येत होते, (ऐषिक अस्त्राने मंतरून) आणि ते काड्या एकमेकांना बरोबर जुडत होते हे सर्व दृश्य राजकुमार आश्चर्याने पाहतच राहिले होते, महान परशुराम शिष्य द्रोण, विहिरीजवळ येऊन त्यांनी अभिमंत्रित केलेले दर्भ एका लांब वेणूच्या काठी प्रमाणे झाली होती. त्याला धरून चेंडू सोबत विहिरीबाहेर काढली व म्हटले,"आपण सर्व महान हस्तिनापूरातील कुमार असून एक साधा चेंडू विहरीबाहेर काढता नाही आला?"
द्रोण म्हणाले,"आश्चर्य वाटले ना पाहून " सर्व कुमार मोठ्याने 'हो' म्हणाले. द्रोणाजवळील उभा असलेल्या छोट्या विकर्णाला द्रोण म्हणाले, " हे कुरु कुमार, आपल्या हातातील अंगठी देशील ?" विकर्ण आश्चर्य पाहण्याच्या उत्सुकतेने लगेच अंगठी काढून दिली. आणि अर्जुनाकडे पाहून म्हणाले," हे कुमार, हा तुझा छोटा धनुष्य बाण पाहू बरें काय आश्चर्य निर्माण करतो ते." असे म्हणून द्रोणांनी आपल्या हातातील ती सुवर्णाची अंगठी त्या विहिरीत टाकून दिली, आणि सर्व कुमार विहिरीत डोकावले, द्रोणांनी त्या छोट्या धनुष्याला बाण जोडला आणि काही तरी मंत्र पुटपुटले आणि त्या विहिरीत बाण सोडला. तो बाण बरोबर अंगठीच्या मध्ये रुतला, आणि तो सरळ वरच्या दिशेने येऊ लागला, द्रोणांनी तो बाण अंगठीसोबत बाहेर काढला. हे आश्चर्य पाहून कुमारांचे डोळे आणखीनच आश्चर्याने, कुतूहलाने मोठे झाले. द्रोण म्हणाले," हे सर्व सरावाने तुम्ही पण करू शकता."
हे सर्व दृश्य पाहून सर्व कुमार आश्चर्य व्यक्त करत होते, तेव्हा जेष्ठ युधिष्ठीर त्या मुनिला प्रणाम करून विनम्रपणे म्हणाला " हे विप्रवर आपण कोण आहात ? आणि हे आपण कसे केलात ?" द्रोण म्हणाले " हे कुमार, हा चेंडू आणि दर्भाच्या कड्यासोबतच तो भीष्मांना दाखवा ते बरोबर ओळखतील मी कोण आहे ते ?" तेव्हा युधिष्ठीर, अर्जुन आणि दुर्योधन हे तिघे जातात आणि जे काय घडले ते सर्व जाऊन पितामह भीष्मांना सांगतात.
द्रोणाचार्यांचे स्वागत आणि आचार्य पद
ही सर्व घटना कुमारांनी पितामह यांना जाऊन सांगताच भीष्म यांनी द्रोणांना बरोबर ओळखले आणि सन्मानाने नगरीत आणून त्यांचा आदर - सत्कार केला. भीष्म म्हणाले " हे परशुराम शिष्य असा कोणता गुन्हा कुरु राजपरिवाराने केला होता, की ज्यामुळे आपण निघून जात आहेत. तेव्हा भीष्मांनी द्रोणांना आपल्या सर्व कुमारांचे आचार्य म्हणून त्यांची नेमून सुध्दा केली, हे स्वागत पाहुन द्रोणानेही आचार्य होण्याचे काबुल केले. तिथूनच द्रोणाचार्य हे आश्रमात कुमारांना रथ, घोडेस्वारी, सर्व शस्त्र, शास्त्र आणि अस्त्र अशा विद्या शिकवू लागले. राजकुमारामध्ये जेष्ठ पांडुपुत्र युधिष्ठीर हा भालायुद्धामध्ये प्रविण झाला, तो शांत, शूर, संयमी, समजूतदार व स्थितप्रज्ञ होता, भीम आणि दुर्योधन हे दोघे गदायुध्द यामध्ये पटाईत होते, समवयस्क, बलशाली, शूर व क्रोधी होते. अर्जुनचा धनुर्विदयामध्ये रस होता, जिज्ञासू, प्रेमळ आणि तेवढाच स्वाभिमानी होता.
द्रोणाचार्य हे आचार्य बनुन गंगाकिनारी सर्वांना शिक्षण देत आहेत, ही वार्ता सर्व आर्यावर्तात पसरली तेव्हा पासून हस्तिनापूराची ही ख्याती ऐकून आसपासच्या राज्यातील, ग्राममधील सर्व कुमार शस्त्र आणि शास्रांचे शिक्षण घेण्यासाठी नगराबाहेरील, गंगाकिनारी असलेल्या द्रोणाचार्य यांच्या, आश्रमात, गुरुकुलमध्ये येत असे, यादव, वृष्णी, अंधक, कुरु इत्यादी आसपास नगरातील कुमार तेथे येत. त्यामध्ये एकदा इतर राजकुमारांप्रमाणे निषादराज हिरण्यधनुका यांचा राजपुत्र एकलव्य आला होता, त्याने द्रोणाचार्यांना विनंती केली की, मला आपला शिष्य करून उपकृत करावे, परंतु द्रोणाचार्यानी त्याची ही विनंती अमान्य केली आणि द्रोणाचार्य म्हणाले " हे निषाद, धनुर्विद्या शिकताना मंत्र उच्चरण करणे आवश्यक आहे, तु निषाध कुळातील असल्याने मी तुझा शिष्य म्हणुन स्वीकार करू शकत नाही." तेव्हा तो वनामध्ये निघून गेला.
गुरुकुलामध्ये असताना शिष्य समवेत द्रोणाचार्य वनविहार करत असताना एक श्वान जोरजोराने उत्तर दिशेस भुकू लागला आणि क्षणार्धात त्या दिशेने सू.. सू..करत एका पाठोपाठ एक बाण त्या श्वानाच्या मुखात रुतून बसले, त्याला धड भुंकताही येईना त्याचा आवाजच बंद पडला, आणि विशेष म्हणजे श्वानाच्या मुखाला कोणतीच इजा झाली नव्हती. हे दृश्य पाहून सर्वजण त्या बाणाच्या दिशेने गेली, तेव्हा तेथे एक निषाधपुत्र द्रोणाचार्याची मातीच्या मुर्तीस वंदन करून धनुष्य बाणाचा सराव करत असे, त्या अभ्यासातूनच त्याला हि विद्या प्राप्त झाली होती. प्रत्यक्ष गुरु द्रोणाचार्य आलेले पाहुन तो अत्यंत आनंदित झाला, त्याने विनम्रपणे गुरु द्रोणांना वंदन करून, मनोभावे पुजाआर्चा केली, द्रोणाचार्य म्ह्णाले, तू कोण?, आणि हे धनुर्विद्या तू कोणाकडून शिकलास? तेव्हा एकलव्य विनम्रपणे म्ह्णाला, की "मी ही धनुर्विद्या आपल्या या मूर्ती कडुनच शिकलो आहे. त्यामुळे आपण माझे आचार्य आहात." द्रोणाचार्य म्ह्णाले, "तु जर मला गुरु स्थानी मनत असेल तर तुझी विद्या आता पूर्ण झाली आहे, तर आता तू गुरुदक्षिणा देण्यास तयार आहेस का?" एकलव्य क्षणाचाही विलंब न करता म्ह्णाला,"आपण जे मागाल ती गुरुदक्षिणा मी देण्यास तयार आहे." द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापुन मागितला. आणि गुरुभक्ती मानून आनंदाने त्याने तो लगेच कापून गुरु द्रोणाचार्यांच्या पायी वाहिला. या प्रसंगामुळे अर्जुनास खूप दुःख झाले, कारण द्रोणाचार्यानी अर्जुनास वचन दिले होते की, मी तुला आर्यावर्ततील सर्वक्षेष्ठ धनुर्धारी करेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा