रविवार, १८ डिसेंबर, २०२२

गुरू द्रोणाचार्य जन्म कथा

 

गुरू द्रोणाचार्य 

कृपाचार्यांची भगिनी कृपी हीच विवाह महर्षी भरद्वाज ऋषी यांचा पुत्र द्रोणाचार्य यांच्या सोबत झाला, पण घरी अठराविश्वे द्रारिद्र्य खूप गरीब परस्थिती असल्या कारणाने हस्तिनापूरच्या कुलगुरू कृपाचार्य यांनी हस्तिनापूरमध्ये येण्याचा सल्ला दिला होता.




द्रोणाचार्य कोण होते ?

एकदा महान भरद्वाज ऋषी एका यज्ञासाठी गंगेच्या किनाऱ्यावर जल स्नान करण्यासाठी महर्षिंसोबत जात होते तर त्या ठिकाणी गंगेच्या काठी अगोदरच एक 'घृताची' नावाची अप्सरा तेथे स्नान करून, ती आपल्या रूपाने आणि यौवनाने पूर्ण संपन्न वाटत होती, आपले वस्त्र बदलत होती तिला पाहून भरद्वाज ऋषी कामातुर झाले आणि वस्त्र बदलत असताना ते वस्त्र हातातुन निसटले, त्या आवस्थेत भारद्वाज ऋषी यांनी त्या अप्सरेला पाहताच आपल्या मनाला ते आवर घालू शकले नाही, तेव्हा त्यांचे वीर्य स्खलित झाले, पण महर्षी सावध होत ते वीर्य यज्ञासाठी आणलेल्या कलशात ( द्रोणामध्ये ) घेतले, तेव्हा त्यातून एका पुत्राचा जन्म झाला.

म्हणून यांचे नाव द्रोणाचार्य पडले. यांचे शिक्षण भरद्वाज ऋषी, गुरु परशुराम यांच्या आश्रमात झाले. शस्त्र, शास्त्र या बरोबरच अस्त्र-विदया मध्ये सुद्धा पारंगत झाले, लहानपणी भरद्वाज आश्रमात असताना द्रोण आणि पांचाळ नरेश पृषत पुत्र द्रुपद यांच्याशी खूप घनिष्ठ मैत्री होती. एकत्र राहणे, एकत्र अभ्यास, एवढेच काय तर ते निरागसपणे नदीपात्रात एकत्र स्नान सुद्धा करीत असत एवढी घनिष्ट मैत्री होती, परंतु पुढे आश्रमातील शिक्षण झाल्यानंतर दोघेही आपआपल्या घरी निघून गेले.

द्रोणांचे दारिद्र्य व अश्वत्थामाचा जन्म 

अठराविश्व दारिद्र असलेले द्रोण खूप गरिबी मध्ये दिवस घालवू लागले, पुढे द्रुपद पांचाळचा राजा झाला, आणि दुसरीकडे द्रोण आपले पिता भरद्वाज ऋषी यांच्या मृत्यू नंतर, हस्तिनापूर कुलगुरू कृपाचार्य यांच्या भगिनी सोबत विवाह झाला, आणि त्यांना एक पुत्र झाला तेव्हा तो जन्मल्यावर अश्वासारखा तो रडला आणि आकाशवाणी झाली हा बालक 'अश्वत्थामा' या नावाने प्रसिद्ध होईल, द्रोणांना याचा खूप आनंद झाला. पुढे अश्वत्थामा मोठा होऊ लागला, आणि इतर राजकुमारसोबत खेळू लागला. जेव्हा त्या राजकुमारांच्या माता आपल्या पुत्रास दूध पिण्यास हाक देत असे, तेव्हा अश्वत्थामा आपली माताला म्हणत असे," माता दूध म्हणजे काय ? सर्व राजकुमार दूध पितात, मला का तू दूध देत नाहीस ?" तेव्हा माता कृपी पाण्याच्या पेलामध्ये भिक्षेचे पीठ टाकुन अश्वत्थामास दिले. हे दृश्य द्रोण आपल्या डोळ्यांनी पाहत होते, त्यांचे हृदय दुःखाने भरून गेले. तेव्हा आपला मित्र द्रुपद पांचाळ राज्याचा राजा झाला आहे, हे कळाल्यावर द्रुपद आपला योग्य आदर सत्कार करेल ही अशा घेऊन सहकुठुंब द्रुपदकडे निघाला.




वाटेमध्ये द्रोण आपली पत्नी कृपी आणि आपला पुत्र अश्वत्थामा यास आश्रमात शिक्षण घेत असताना द्रुपदासोबत आपण कसे, वाढलो, कसे शिकलो, काय शिकलो, याविषयी बोलत आणि आपल्या जुन्या आठवणी सांगत चालले होते. द्रोण म्हणाले " कृपी, द्रुपदाने मला अर्धे राज्य देण्याचे सुध्दा कबूल केले होते. आणि तो देहींलहि पण माझी तेवढी अशा नाही मला फक्त एक गाय हवी आहे तेही माझ्या प्रिय अश्वत्थामासाठी." असे म्हणून पांचाळ नागरीकडे ते चालत निघाले.

द्रोणाचार्यांचा अपमान 

पांचाळ नगरीत गेल्यावर दरबार चालू होता तेव्हा द्वारपालांनी आडवले व विचारले असता "मी द्रुपदचा सखा आहे द्रोण माझे नाव आम्ही भरद्वाज आश्रमात एकत्र शिक्षण घेतले आहे." असे सांगितले. द्रुपद राजाने विचारले असता "मी आपला बालसखा, आश्रमात एकत्र खेळलो, वाढलो तुला आठवत असेलच एक मित्र दुसऱ्या मित्राकडे दान मागण्यसाठी आला आहे," द्रुपद अहंकाराने म्हणाला " तू कोण? कुठला? मला नाही आठवत आणि आश्रमात जरी तू असलास तरी तूझ्या सारखे खूप सहकारी आश्रमात होते त्या सर्वांनाच मित्र म्हणावे का मी ? राहिला प्रश्न दानाचा तर एक भिक्षुक ब्राम्हण म्हणून तू मागेल ते दान द्यायला मी तयार आहे." द्रोण म्हणाले " हे द्रुपद, दान म्हणून मला फक्त तुझी मैत्री हवी होती." द्रुपद अहंकाराने गरजले, "असंभव ब्राम्हण ! एक राजाची मैत्री एक राजासोबतच होते आणि एक सामान्य व्यक्तीची मैत्री एक सामान्य व्यक्तीसोबतच होऊ शकते राजासोबत नाही, तु जी विद्या ग्रहण केलीय ते घेऊनसुद्धा निष्फळ आहे येवढी साधी गोष्ट तुला समजत नाही." मग द्रोणांचा राग अनावर झाला आणि म्हणाले " मी माझ्या मित्राकडे माझ्या पुत्रास (अश्वत्थामास ) दुधासाठी फक्त एका गाईची अपेक्षा घेऊन आलो होतो, तू माझा अपमान केलास मी सहन केलो पण तू माझ्या विद्याचा अपमान केला आहेस या तुझ्या सत्तेच्या, सिंहासनाच्या बळावर तू आपल्या मित्रत्वाचा अवमान करतोस याच माझ्या विद्याचा बळावर तुझे हे पांचाळ राज्य मी उध्वस्त करेन, याच सिंहासनावर मी माझ्या पुत्रास अभिषेक करेन, तेव्हाच मी माझे मुख तुला दाखवेन."असे म्हणून द्रोण आपल्या कुठुंबासह वादळासारखे निघून गेले.




काही काळानंतर द्रोणांनी आपल्या कुठुंबसह पांचाळचा त्याग करून हस्तिनापूर पासुन थोडे दूर पांचाळ राज्याच्या निकट, गंगाकिनारी आपला आश्रम स्थापन करून राहू लागले. हस्तिनापूर म्हणजे सुवर्णाची खाण, स्वप्नपूर्तीचा स्वर्ग, कुरु कुळाचे शंतनुपुत्र पितामह भीष्म यांच्या देखरेखी खाली, महाराज धृतराष्ट्र यांना सिंहासनावर बसवुन राज्य करत होते.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...