रविवार, १८ डिसेंबर, २०२२

कौरव पांडवांची जलक्रीडा 

 

एकदा दुर्योधन आपल्या पिताश्री बरोबर असताना दुर्योधन म्हणाला " पिताश्री काल मामाश्रीनी मला आपल्या गंगाकिनारी असलेल्या बागेत घेऊन गेले होते, फार सुंदर बाग आहे, वेगवेगळी फुले, फळे, त्या बागेत आहेत, पांडव आत्ताच वनांतून आलेले आहेत, आणि आम्ही सुध्दा या राजवाड्याबाहेर कधी गेलो नाहीत, तेव्हा पिताश्री आपण आम्हा बालकांसाठी जलक्रीडेचे आयोजन करावे. तेवढाच आमच्यासाठी वेगळा अनुभव घेता येईल."

धृतराष्ट्राचे मन आपल्या पुत्राचे हट्ट पुरवणे भागच आहे असे म्हणू लागले. तेव्हा त्यांच्या सुरक्षा देखिल घेण्याचे त्यांनी आपल्या मंत्र्यांना आदेश दिले. खुप सारे दास - दासी सोबत दुरोधनादी १०० कौरव व ५ पांडव एक दु:शला भगिनी इ. सर्वांसाठी जलक्रीडेचे आयोजन केले गेले.

सत्यवती, अंबिका व अंबालिका वनप्रस्थान

एके दिवशी महर्षी, भगवान वेद व्यास हस्तिनापूरमध्ये आले असता सर्वांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा महर्षी दरबारात सर्वांना सांगू लागले," माता या पुढे या विश्वात, धर्म, कर्म यांचा लोप होणार आहे, खूप साऱ्या दुःखाने, अहंकाराने, मत्सराने ग्रासणार आहे, तेव्हा आपण आपल्या हस्तिनापूरच्या हितासाठी, सिंहासनासाठी आपण संघर्ष केलात, सुख - दुःख भोगलात, पण यापुढे पृथ्वीवर मोठा संहार होणार आहे, ते तु पाहू शकणार नाहीस माते, तेव्हा आता तो समय आला आहे, तु वनामध्ये जाऊन आपले उर्वरित जीवन तप, योगसाधना, आराधना यामध्ये मन गुंतवुन आपल्या ऊर्ध्व गतीसाठी प्रयत्न करावे, वानप्रस्थाश्रम स्वीकारावे हि विनंती." तेव्हा माता सत्यवती यासाठी तयार झाली, आणि त्याच बरोबर अंबिका व अंबालिका या ही वनामध्ये जाण्यास तयार झाल्या.

आणि काही कालावधीतच वनात घोर तपश्चर्या करून सत्यवती, अंबिका व अंबालिका त्यांनी आपला देह त्याग केला. (आदिपर्व अध्याय १२७, श्लोक ०१ - १९)

कौरव पांडवांची जलक्रीडा

युधिष्ठीर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव हे पाच जण आपली माता कुंती हिच्या दर्शनासाठी प्रभातकाळी गेले असता. कुंती आपल्या महालाच्या कक्षात देव आराधना करत होती, पाचही पांडव जवळ जाऊन कुंतीचे चरण स्पर्श करतात. कुंती त्यांना आशीर्वाद देते, आणि म्हणते," माझ्या पुत्रांनो विश्वामध्ये तुम्ही कोठेही जाल तेव्हा तुम्ही सर्व एकत्रच राहिले पाहिजे. युधिष्ठीर तु जेष्ठ आहेस, या सर्वांची जबाबदारी तुझीच आहे. भीम तु फार खोडकर आहेस, रागावर नियंत्रण मिळव, नकुल आणि सहदेव अजून लहान आहेत त्यांचा तुम्ही तिघांनीही सांभाळ केला पाहिजे." युधिष्ठीर म्हणाला होय माते, आम्ही सर्व एकत्रच राहून, एकमेकांचा सांभाळ करू." तेव्हा पांडव आपल्या राजमहाला बाहेरील असलेल्या रथावर सर्वजण विराजमान होऊन त्यांचा रथ गंगा नदी किनारीच्या बागेकडे जलक्रीडासाठी निघाला. पांडव येण्याअगोदरच १०० कौरव येऊन आपआपले खेळ त्यांनी सुरुवात पण केले होते, कोण फळाचे सेवन करत होते, कोण फुले वेचत होते, काहीजण तर झाडांवर चढुन फळे पाडत होते. काहीजण गंगानदीमध्ये पाण्यावर तरंगण्याचा, पोहण्याचा खेळ खेळत होते.

भीमावर विष प्रयोग

कौरव, पांडव यांची जलक्रीडा चालु होती, धृतराष्ट्र यांनी मोठ्या उत्साहाने जलक्रीडेचे आयोजन केले होते, पण शकुनीच्या मनामध्ये काही वेगळेच होते, कौरव, पांडव त्या जलक्रीडेचा आनंद मनमुरादपणे लुटत होते. पांडव खेळामध्ये गुंतले आहेत हे पाहून, दुर्योधन भीमाला म्हणाला " भीम, तुझ्या आवडीची खीर खाणार का ? " भीम लगेच ' हो 'म्हणाला. तेव्हा कोणाचे लक्ष्य नाही ना याची खात्री करून, दुर्योधन आपल्या शिबिरामध्ये (प्रत्येक राजकुमारांसाठी गंगाकिनारी राहुट्यासारखी राहण्याची सोया केली होती.) भीमाला आणतो तेव्हा तेथे दुःशासन अगोदरच तेथे उपस्थित होता. दुःशासनाने अतिशय प्रेमाने भीमास खिरीचे भांडे दिले ती भीमाने क्षणार्धात संपवली, दुर्योधन म्हणाला " आणखीन हावी आहे का तुला खीर ? " भीमाने ओठांवर जिभ फिरवत म्हणाला " हो, आणखीन हवी आहे, खूप छान झाली आहे." दुसरे, तिसरे, चौथे असे करत भीमाने सर्व खीर संपविली, आणि दुर्योधनाला म्हणाला " मला थोडी निद्रा येतीय मी थोडी निद्रा घेतो." असे म्हणुन भीम त्याच जागी झोपी गेला. एवढ्यात जलक्रिडेने थकलेले सर्वंकुरुकुमार आपआपल्या शिबीराकडे जात होते तेव्हा रात्रीचा फायदा घेत दुर्योधन आणि दुःशासन यांनी भीमास वनातील आणलेल्या वेलीने करकचुन बांधून टाकले आता या क्षणापर्यंत भीमाच्या संपूर्ण शरीरात कालकूट विष भिनले होते, दुर्योधन व दुःशासन दोघांनी गंगा नदीमध्ये टाकून दिले. हे सर्व शकुनी सांगितलेल्या प्रमाणे दुर्योधनाकरवी करत होते, भीमाच्या आवडीच्या खाण्यामध्ये काळकूट नावाचे विष मिसळून मारण्याचे षडयंत्र जलक्रीडेच्या नावाखाली रचले होते. शकुनी म्हणत " एकदा का ह्या भीमास मारले की, इतरांना मारणे अधिक सोप्पे होईल.

रात्र झाली होती पण तो पर्यंत भीम कोठेच सापडत नाही, म्हणून त्याचा सर्व पांडव जलक्रीडासाठी आलेल्या ठिकाणी शोध घेत होते. सर्वांच्या शिबिरामध्ये शोधले पण भीम मात्र सापडलाच नाही. कुंती मातेस काय सांगावे या चिंतेने युधिष्ठीर अधिक चिंतेत झाला.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...