रविवार, १८ डिसेंबर, २०२२

पांडू व कुंती संवाद

 

शतशृंग पर्वतावर पांडूसहित कुंती व माद्री आल्या पासून तेथील सर्व ऋषी - मुनी, साधू लोकांचे मनोभावे त्यांनी त्यांची सेवा केली. ते पण पांडुस आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम देत असत, काही ऋषी आपल्या बंधू प्रमाणे त्यांचे नाते जमले होते.

पांडूचे पितृलोककडे जाणाऱ्या ऋषींना विचारणा

एके दिवशी अमावस्येच्या दिवशी अनेक ऋषी - मुनीचा समुह आकाश मार्गाने प्रस्थान करत असताना दिसले तेव्हा पांडू त्यांना म्हणाला " हे ऋषिवर्य आपण कोठे जात आहेत ?" त्यातील एक ऋषी म्हणाले, "हे राजा पांडू आम्ही ब्रह्मलोक येथे देवता, ऋषी-मुनी, महर्षी, आणि महान पितृ यांचा समुह एकत्र होणार आहे. तेथेच आम्ही त्रिदेवातील स्वयंभू ब्रम्हाजी यांच्या दर्शनासाठी चाललो आहोत " हे ऐकताच पांडू ही आपल्या दोन्ही पत्नी समवेत तयार झाला, तेव्हा समुहातील एक ऋषी म्हणाले, "हे पांडू ब्रह्मलोक एवढे सोप्पे नाहीये, या रमणीय पर्वत शृंखला रमणीय तर आहेच, पण बर्फाने आच्छादलेले अति उंच, दुर्गम पर्वत, खोल दऱ्या, मोठमोठ्या नदया आहेत. ते स्थान देवतांचे, गंधर्वां - अप्सरांचे क्रीडा स्थान आहे, त्यामुळे ते स्थान देवतांच्या विमानाने खचाखच भरलेले तुला दिसतील, तेथे मधुर स्वर गीत ऐकू येतात, आणि या पर्वतराशीतच कुबेरांचे अनेक उद्याने पण आहेत. काही ठिकाणे अशी पण आहेत तेथे कायम बर्फाच्छादित प्रदेश आहेत, तेथे मनुष्यच काय तर वृक्ष, पक्षी पण नाहीत. काही ठिकाणी अंधारे गुहा पण आहेत. त्यात प्रवेश करणे तर सोडाच, तेथे पाहोचणे पण अत्यंत कठीण आहे. एखादा पक्षी पण हे पार करू शकत नाही. तेथे फक्त वायू, आणि सिद्ध, महर्षी ऋषीच जाऊ शकतात त्यामुळे तू आमच्या बरोबर येण्याचा विचार त्यागावा, आणि या तुझ्या दोन पत्नी हे कष्ट नाही सहन करू शकणार " (आदिपर्व अध्याय - ११८, श्लोक १-१६)

मनुष्याचे कोणते चार प्रकारचे ऋण ?

पांडू म्हणाला "आम्ही ते कष्ट पण पार करू महर्षी" त्यातील एक जण म्हणाला " हे पांडू मनुष्य एकूण चार प्रकारचे ऋण घेऊन जन्म घेतात १) देव ऋण, २) ऋषी ऋण, ३) पितृ ऋण, आणि ४) मनुष्य ऋण यातील यज्ञ, दान धर्म या द्वारे देवतांना संतुष्ट केले जाते, सेवा, तप या द्वारा ऋषी यांना संतुष्ट केले जाते, श्राद्ध कर्म, पुत्रत्पादन या द्वारा पितृना संतुष्ट केले जाते, आणि सर्वांना दयापूर्ण दृष्टीने पाहणे या द्वारा मनुष्याला संतुष्ट केले जाते या चार ऋणातून तू देव, ऋषी, आणि मनुष्य या ऋणातुन मुक्त झालास केवळ एक पितृ ऋणातुन मुक्त होऊन स्वर्गात येऊ शकतोस." या महर्षींच्या वचनाने पांडूचे मन अतिशय विषन्न, दुःखी, आणि उदास झाले.

पुत्र कोणास म्हणतात ? पुत्र कोणास मानावे ?

एके दिवशी पांडू कुंती समवेत एकांतात बसले असता, पांडू ऋषीं बरोबर झालेल्या सर्व वृत्तांत कुंतीला सांगतात. " हे पृथे माझ्या मनामध्ये एक विचार येत आहे, कि ज्याप्रकारे माझ्या पिताश्रीच्या मृत्यु नंतर, माताश्रीनी महर्षी व्यास यांच्या कडून पुत्र प्राप्ती करून घेतली, त्याप्रमाणे, तु पण एक श्रेष्ठ ऋषी - महर्षी कडून नियोगाने मज पुत्र प्राप्त करून द्यावे. जे कुठुंबीय नसुन सुध्दा उत्तराधिकारी मानले जाते, शास्त्रामध्ये त्याचे प्रकार सांगितलेले आहे, (आदिपर्व अध्याय - ११९, श्लोक ३३-३७)

१) विवाहित पत्नी पासून आपल्या द्वारा उत्पन्न केला गेला जातो त्यास ‘स्‍वयं-जात’ असे म्हणतात.

२) कोणत्या तरी उत्तम पुरुषाकडून आपल्या पत्नीच्या गर्भापासून उत्पन्न झालेला त्यास 'प्रणीत' म्हणतात.

३) आपल्या पुत्रीचा, पुत्र त्यालाही पुत्रासमान मानला आहे.

४) दुसऱ्या विवाह झालेल्या स्त्री पासुन उत्पन्न झालेला पुत्र त्यास 'पौनर्भव' म्हणतात.

५) कन्येच्या विवाहापूर्वी त्या कन्येला या वचनावर दिले जाते की, या कन्येच्या गर्भापासून उत्पन्न झालेला पुत्र हा माझा समजावा, त्यास 'कानीन' म्हणतात.

६) जो आपल्या बहिणीचा पुत्र ( भांजा / भाच्चा )

हे सहा प्रकारचे पुत्र कुठुंबातील नसुन सुध्दा शास्त्रामध्ये त्याला उत्तराधिकारी मानले गेले आहे. परंतु वरील प्रमाणे पुत्र नसतील तरच खालील प्रकारचे पुत्र म्हणुन उत्तराधिकारी मानले जाते.

१) दत्त - ज्याला माता- पित्याने स्वतः समर्पित केले आहे तो.

२) कृतिम - मी स्वतः आपला पुत्र आहे, असे म्हणुन जो जवळ येतो तो.

३) सहेढ़ - जी कन्या अवस्थ्येमध्येच गर्भवती होऊन, तिचा विवाह झाला असेल तिचा पुत्राला सहेढ़ म्हणतात.

४) ज्ञातिरेता - ( आपल्या कुळाचा पुत्र ) किंवा आपल्या पासुनच हीन जातीच्या स्त्रीच्या गर्भापासून उत्पन्न झालेला पुत्र.

या प्रकारचे वचन स्वयंभुव मनु ने सांगितलेले आहे. तेव्हा हे कुंती तु पण मला इतर श्रेष्ठ पुरुषांकडून मला पुत्र प्राप्त करून द्यावे." परंतु त्या पतिव्रता कुंतीने महाराज पांडूच्या या विचाराला नकार दर्शविला, आणि एक कथेचा दाखला ती देऊ लागली.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...