रविवार, १८ डिसेंबर, २०२२

१०० पुत्राचे गांधारीस वरदान

 

कुंती पांडूला सांगु लागली," फार पूर्वकाळी पुरुवंशामध्ये धर्मात्मा राजा व्‍युषिताश्व होऊन गेले. त्यांनी यज्ञयाग, दान - धर्म करून संपूर्ण मनुष्यास नव्हे तर स्वर्गातील देवतांना सुध्दा प्रसन्न करून घेतले होते. आणि अश्वमेध यज्ञ करून संपूर्ण पृथ्वीवरील राज्यांना जिंकुन घेतले होते. राजा कक्षीवान यांची कन्या भद्रा हिचा विवाह व्‍युषिताश्व यांच्या बरोबर झाला, ती दिसायलाही खूपच सुंदर होती. पण विवाह झाल्यापासून काही कालावधीतच महाराज व्‍युषिताश्व यांचा राजयक्ष्‍मा या आजाराने मृत्यू झाला. या घटनेने घटनेने भद्राला खूप दुःख झाले, पुत्र नसल्याने ती अधिकच दुःखी झाली, ती आक्रोश, विलाप करू लागली. तेव्हा आकाशवाणी झाली की," हे भद्रे तुझ्या गर्भातुन पुत्र जन्मा येतील, माझ्या या शवासोबत तु निद्रा घे," या आकाशवाणी प्रमाणेच भद्राने केले तेव्हा तिला एकूण सात पुत्र प्राप्त झाले, त्यात तीन शाल्‍वदेशाचे राजे झाले आणि बाकी चार मद्रदेशचे नरेश झाले.

सम्राट, मी पण भद्रे प्रमाणे दुसऱ्या कोणत्याच परपुरुषाबरोबर समागम करायचा विचार पण नाही करू शकत." पांडू म्हणाला " कुंती पण माझा जर निपुत्रिक होऊन मृत्यु झाला तर मला स्वर्ग प्राप्ती नाही होणार." कुंती पांडूला धिर देऊन म्हणाली," आर्य, त्यावर एक उपाय आहे, आपल्याला पुत्र होतील, ते महर्षी दुर्वासा यांनी दिलेल्या मंत्राने. पांडू म्हणाला "ते कसे काय कुंती ?"कुंती म्हणाली,"मी आपल्याला सविस्तर सांगते " मी बालपणी महर्षी दुर्वासा यांची खूप मनोभावे सेवा केली होती, ते कुंतिभोज येथे अनुष्ठानासाठी आले होते, तेव्हा त्यांच्या देखभालीची जबाबदारी पिताश्रीनी मला दिली होती. त्या सेवेने प्रसन्न होऊन त्यांनी मला काही मंत्र पण दिलेत, त्याचा उपयोग करून मी कोणत्याही देवतांचे आवाहन करून, त्यांच्या सम तेजस्वी पुत्र प्राप्त करून घेऊ शकते." या बोलण्याने पांडू अधिकच खूष होऊन त्यांनी कुंतीला त्या दैवी मंत्राचा उपयोग लगेच करावयास सांगितले. तेव्हा काही कालावधीतच कुंतीने आपल्या हस्तिनापूर राज्याच्या हितासाठी योग्य सम्राटाची, राजाची आवश्यकता असल्याने तो पुत्र न्यायी, धर्मशील, शांत, संयमी, व विशाल मनाचा हवा त्यामुळे कुंतीने यमधर्म या देवतेला मंत्रोउच्चाराने प्रसन्न करून त्यांच्या सारखाच पुत्र द्यावा असे वरदान मागितले, तेव्हा यमधर्म तथास्तु म्हणुन तो आशीर्वाद कुंतीला दिला.

गांधारीस वरदान

पांडू आपल्या दोन्ही पत्नीसह वनात शरीराचा थकवा घालवण्यासाठी जे गेले ते परत आलेच नाही, दुतांकडून बातमी येत होती की ते शतशृंग पर्वतावर ऋषी - मुनी, साधू यांची सेवेमध्ये आपला वेळ घालवत आहेत, पण नंतर तर ते बातमी पण यायचे बंद झाले, हस्तिनापूरमध्ये एके दिवशी महर्षी व्यास मुनी खूप दूर वरून प्रवास करून आल्याने खूप थकल्या सारखे वाटत होते, ते जेव्हा राजमहालात आले तेव्हा महाराणी गांधारीने स्वतः त्याचे यथोचित गौरव - सत्कार केला आणि त्यांची भोजन व्यवस्था, विश्रामाची व्यवस्था करून महर्षीना संतुष्ट केले, हा जो आदर - सत्कार पाहून व्यास ऋषी खूपच खुश झाले व गांधारीला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा गांधारीने " मला माझ्या पती सामान शंभर पुत्र व्हावेत असा वर द्या." व्यास मुनी 'तथात्सु' म्हणून निघुन गेले, पुढे काही कालावधीतच गांधारीला गर्भधारणा झाली.

युधिष्ठीराचा जन्म

पुढे वर्षभराने धर्मशील पुत्र झाला त्याचे नाव पांडूने 'युधिष्ठीर' असे ठेवले याचा अर्थ जो युध्दात ही स्थिर राहतो तो. या पुत्रामुळे पांडुस फार आनंद झाला. ही बातमी जेव्हा हस्तिनापुरात कळाली तेव्हा तेथेही सर्वानाही फार आनंद झाला, तेव्हा गांधारी एक वर्षांची गर्भावती होती, फक्त दोनच व्यतींना तो आनंद नाही वाटला एक धृतराष्ट्र आणि दुसरा शकुनी, कारण गांधारीचे कुंतीपेक्षा आगोदर विवाह होऊन सुध्दा अजून पर्यंत प्रसव का झाला नाही यामुळे चिंतित होते. तेव्हा गांधारीस ही फार दुःख झाले तीला कुंतीचा मत्सर वाटु लागला. अजुन प्रसव का झाला नाही ? या कारणाने राजवैद्य यांच्याकडुन वेगवेगळ्या प्रकारचे औषधी काढा, उपचार, साधु - संत यांचे भेटी, दान - धर्म असे सर्व प्रकारे उपाय करून झाले. पण दोन वर्ष झाली तरी गांधारीस प्रसव होत नव्हते, त्यामुळे सर्व राजपरिवारात चिंतेचे वातावरण होते.

गांधारीचे आक्रोश

पण जेव्हा वनामध्ये कुंती दुसऱ्या वेळेस गर्भवती आहे हे समजल्यावर मात्र गांधारीला फार दुःख झाले, उद्विग्न मनाने ती रडू लागली, आक्रोश करू लागली, तेव्हा राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, कुलगुरू कृपाचार्य, अंबिका, अंबालिका, बंधू शकुनी या सर्वांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. या दुःखाच्या भरात तिने आपल्या गर्भावर आघात करू लागली, मारण्यास सुरवात केली, जोरदार आघाताने गांधारीला असहनीय वेदना होऊ लागल्याने ती मूर्च्छित होऊन पडली. (आदिपर्व अध्याय ११४, श्लोक १८ - ३५)

to be continued.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...