रविवार, १८ डिसेंबर, २०२२

पांडूचे अकाली निधन

 

सम्राट पांडू आपल्या दोन्ही पत्नी कुंती आणि माद्री सोबत शतशृंग पर्वत शिखरावर तप, करीत, वनामध्ये फळे, कंदमुळे खात. अशा प्रकारे आपले जीवन व्यतीत करत असे.

पांडूचे मनात कामवासना

असेच दिवसा मागुन दिवस जात होते मग कामी पुरुषांची मने उचंबळून सोडणार वसंत ऋतू येतो, त्या शतशृंग पर्वत व वनातील सर्व वृक्षे, नवनवीन पालवींनी फुलून जातात, वेगवेगळी फुले मनमोहक, सुगंधाने सर्व वातावरण सुशोभित करत होते, शितल आणि मंद वारा वाहू लागला होता. महाराज पांडू वनामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी मन एकाग्र करत होते, तेव्हा कुंती कुटीमध्ये काही कामानिमित्य राहिली म्हणुन माद्री ही प्रात:काळी जल आणण्यासाठी जाते, पांडू जवळच वनात तप करत होते, पायातील पैंजणाचा नाजुक आवाज ध्यान भंग करत होता, आवाजाच्या दिशेने पांडूचे ध्यान आपोआपच खेचले जाते, आणि पाण्याचे ठिकाण एका उंच पर्वतावरून पडणारा झरा जवळूनच वाहत होता, ते निर्मल, थंडगार झऱ्याचे पाणी भरण्यासाठी एक सुंदर मनमोहिनी स्वर्गातूनच अवतरली असावी असा भास पांडूला होतो, पण नीट निखून पाहतो तर माद्री मातीचे कुंभ घेऊन जल भरत होती, पांडूच्या मनात वाटू लागले की, आज माद्री अधिकच कामुक, जणु काही रतीचा अवतार वाटत होती, तिचे सुंदर मुख, सडपातळ चिंब भिजलेला देह, ओले केश, तिच्या देहावरील सुंदर रंगबेरंगी वस्त्र, आणि त्या भिजलेल्या वस्त्रातून तिचा देह स्पष्ट दिसत होता, पांडूचे मन या दृश्याने विचलित झाले. पांडूच्या मनामध्ये एक मोठे वादळ निर्माण झाले होते आणि त्या वादळाची दिशा कामवासनेकडे जात असते.

त्यात भर म्हणुन वातावरणही फुलुन गेलेले तो काळ होता चैत्र आणि वैशाख या मासातील संधीकाळ होता, तेव्हा पलाश, आम्र, चंपा, पारिजातक इत्यादि अनेक वृक्ष, फुलाफळांनी बहरून गेले होते, वेगवेगळ्या प्रकारच्या, चित्रविचित्र रंगांच्या फुलांनी, कमळांनी जलाशयही, रंगून टाकले होते, असे दृश्य मन उचंबळून टाकी.

इकडे माद्रीला जगाचे कोणतेच भान राहिले नव्हते, ती मात्र अल्लड बालिके समान पाण्यासोबत खेळत असते, मुखावर, हातावर, पायावर ती त्या झऱ्याच्या थंडगार पाण्याचा आपल्या शरीरावर टाकत अनुभव घेत होती. तीच्या शरीरावर झिरमिरीत खूपच पातळ असे कापडाची साडी होती, आणि त्या वस्त्रांवर पाणी पडलेले पाहून पांडू अधिकच कामासक्त झाले. त्यांच्या विवेकाची जागा आता कामवासनेने घेतली होती, ते हळूवारपणे पाठीमागहून जाऊन माद्रीला मिठीत घेतात.

पांडुवर काळाचा घाला आणि मृत्यू

माद्रीने पांडूच्या मिठीतुन सुटण्याचा भरपूर प्रयत्न केला पण पांडूच्या अजस्त्र हातापुढे ती हतबल झाली, माद्री पांडूला सोडण्याची वारंवार विनंती पण करत होती, किंदम ऋषींच्या शापाचा पण पांडूला विसर पडला होता. तेव्हा पांडूच्या मनावर, शरीरावर पूर्णपणे कालरूपी कामाचा अधिकार चालत होता. तेव्हा माद्री मिठीत असतानाच पांडूच्या शरीरातून एक विजेसारखी एक कळ निर्माण होऊन पांडूचे हाताची मिठी आपोआप सैल झाली, पांडूचे शरीर थंडगार पडलेपांडूचे शरीर धरतीवर शांत पडले. माद्री मोठमोठ्याने ओरडत होती.

माद्री सती जाते

माद्री का बरे रडत असेल ?, काय झाले असेल ?, असे अनेक प्रश्न कुंतीच्या मनात येऊ लागतात. ती कोणताही विचार न करता हाकेच्या दिशेने धावत सुटते, माद्रीचा आवाज ऐकून कुंती सर्व पुत्रासह तिथे आली, कुंतीला ते दृश्य पाहून धक्काच बसला, ती माद्रीला दोष देत रडत राहिली ,पांडूच्या शवाकडे पाहत मूर्च्छित झाली. तेव्हा माद्रीने आणि युधिष्ठीराने कुंतीला जागे केले, या घटनेमध्ये माद्रीची कोणतीच चुक नव्हती तेव्हा जेव्हा कळले तेव्हा माद्रीला म्हणते " माद्री तुला आर्याचे रक्षण करावयास हवे होते, अशी कोणतीच गोष्ट तू करायला नको होती, जी आपल्या आर्याच्या जीवावर बेतेल, तुला शापाविषयी माहित होतेना मग का हिरवलेस आर्यांना माझ्यापासून ?" कुंती, माद्री आणि त्यांचे पुत्र रडतच राहिले, दिवस मावळतीकडे झुकू लागला, तेव्हा सायंकाळपर्यंत त्या परिसरातील सर्व ऋषीमुनी यांनी पांडूची चिता रचुन अग्निदाह देण्यासाठी युधिष्ठिराला बोलावले. तेव्हा कुंती म्हणते " मी जेष्ठ आहे, पांडूची धर्मपत्नी मी आज आर्य बरोबर स्वर्गात त्याच्याबरोबरच जाणार" तेव्हा माद्री म्हणते, "दीदी, ह्या घटनेला मी जबाबदार आहे, माझ्या मुळेच आर्यांना मिळालेला शाप खरा ठरला, आर्यांनी माझ्यासोबत कामासक्त होऊन माझ्याशी संग करण्याचा प्रयत्न केला, मी कितीही विनवणी केली पण काही उपयोग झाला नाही. आता मी कोणत्या मुखाने हस्तिनापुरी जाऊ, हस्तिनापुरातील प्रजाही मला नको नको ते बोल लावतील तेव्हा महाराणी म्हणून तुम्ही मला आदेश द्या की या चिते बरोबर तू ही सती जा, मी तर निर्णय घेतलाय पण दीदी माझ्या पुत्रांना आपल्या पुत्रांप्रमाणे वाढवा, ते तुमच्या मंत्राच्या साहाय्यानेच झाले आहेत." असे म्हणून तेथील सर्व ऋषी मुनी या सर्वांचा आशीर्वाद घेऊन माद्री पांडूच्या चितेबरोबर सती जाते. आता कुंतीवर आभाळ फाटल्यासारखे झाले.

अशाप्रकारे पांडूचा अकाली निधन होते आणि त्याच्या सोबत माद्री सती जाते. पांडूच्या निधना नंतर मथुरेहून वृष्णी कुळातील यादव वसुदेव यांनी काश्यप मुनींनी अग्निसंस्कार, आणि त्यानंतरचे सर्व विधी यथासंग शास्त्रोक्त पद्धतीने केले.

to be continued....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...